साडेतीनशे पॉझिटिव्हची सरासरी कायम! बाधितचा दर घसरला, बळींची संख्या 193 वर!

बुलडाणा (विशेष प्रतिनिधी ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः चालू आठवड्यातील साडेतीनशे कोरोना रुग्ण संख्येची सरासरी आज, 28 फेब्रुवारीच्या एन्डला देखील कायम राहिली! पॉझिटिव्हीटीचा दर घसरला असला तरी रुग्ण संख्या काहीही केल्याने कमी होत नसल्याने प्रशासन व आरोग्य यंत्रणेसमोरची आव्हाने वाढली आहे.नमुने संकलनात यंत्रणा मागे नाहीच हे आज पुन्हा दिसून आले. काल रॅपिडचा वेग वाढविण्यात आला. …
 

बुलडाणा (विशेष प्रतिनिधी ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः चालू आठवड्यातील साडेतीनशे कोरोना रुग्ण संख्येची सरासरी आज, 28 फेब्रुवारीच्‍या एन्डला देखील कायम राहिली! पॉझिटिव्हीटीचा दर घसरला असला तरी रुग्ण संख्या काहीही केल्याने कमी होत नसल्याने प्रशासन व आरोग्य यंत्रणेसमोरची आव्हाने वाढली आहे.
नमुने संकलनात यंत्रणा मागे नाहीच हे आज पुन्हा दिसून आले. काल रॅपिडचा वेग वाढविण्यात आला. यामुळे 1725 रॅपिड, 1633 आरटीपीपीसीआर व 100 ट्राउंट मिळून तब्बल 3458 स्वॅब नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले. पैकी 3260 चे अहवाल निगेटिव्ह झाले असून, 340 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आलेत. गत्‌ काही दिवसांच्या तुलनेत पॉझिटिव्हीटी रेट 9.41 टक्के येणे यंत्रणेसाठी मोठा दिलासा ठरला आहे. बळींची संख्या 193 वर पोहोचली आहे.
खामगाव आघाडीवर, मेहकरात गंभीर वाढ
दरम्यान, खामगाव तालुका 62 रुग्णांसह आघाडीवर आहे. त्याखालोखाल बुलडाणा 54, शेगाव 46, देऊळगाव राजा 37, नांदुरा 24, जळगाव जामोद 30 या तालुक्यातील बधितांची संख्या गंभीरच आहे. मात्र अलीकडे शांत असलेल्या मेहकर तालुक्यातील संख्या 48 निघणे धोक्याची घंटा मानली जात आहे.