सामूहिक गळफास घेणार होते शेतकरी; दोरही अडकवला, अन्‌… मलकापुर तालुक्यातील प्रकार

मलकापूर (गजानन ठोसर ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः महावितरण कंपनीने वीज कनेक्शन कापले म्हणून रोहित्रावरच दोर अडकवून शेतकरी सामूहिक गळफास घेणार होते. ही बाब मलकापूरचे नगराध्यक्ष ॲड. हरीश रावळ यांना कळताच त्यांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन शेतकऱ्यांची समजूत काढली. त्यामुळे शेतकऱ्यांनी निर्णय मागे घेतला. मलकापुर तालुक्यातील चिखली रणथंब येथील शेतकऱ्यांचे 6 रोहित्रांवरील वीज कनेक्शन महावितरणने कापले …
 

मलकापूर (गजानन ठोसर ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः महावितरण कंपनीने वीज कनेक्शन कापले म्हणून रोहित्रावरच दोर अडकवून शेतकरी सामूहिक गळफास घेणार होते. ही बाब मलकापूरचे नगराध्यक्ष ॲड. हरीश रावळ यांना कळताच त्यांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन शेतकऱ्यांची समजूत काढली. त्‍यामुळे शेतकऱ्यांनी निर्णय मागे घेतला.

मलकापुर तालुक्यातील चिखली रणथंब येथील शेतकऱ्यांचे 6 रोहित्रांवरील वीज कनेक्शन महावितरणने कापले होते. त्यामुळे जवळ जवळ दोनशे एकर शेतशिवारातील पिकांचे मोठे नुकसान होत होते. उन्हाळी मका, लसूण, ज्वारी, ऊस या पिकांचे उत्पन्न धोक्यात आले. थकीत विजबिलाचा भरणा केल्यानंतरच वीज कनेक्शन जोडण्यात येईल, अशी भूमिका महावितरणच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी घेतली होती तर या पिकाचे उत्पन्न निघाल्यानंतर वीजबिल भरू, असे शेतकऱ्यांनी सांगितले होते.  आज, 25 मार्चला सकाळी महावितरण कंपनी विरोधात रोष व्यक्त करण्यासाठी रोहित्रावरच सामूहिक गळफास घेण्यासाठी शेतकरी पोहोचले होते. मलकापूरचे नगराध्यक्ष ॲड. हरीश रावळ यांना ही बाब कळताच त्यांनी रणथंब येथे जाऊन शेतकऱ्यांची समजूत काढली. स्वतः  खांबावर चढून वीज जोडणी करून दिली. महावितरणने पुन्हा वीज कनेक्शन तोडले तर अधिकाऱ्यांच्या कानाखाली जाळ काढण्यात येईल, असा इशारा ॲड. हरीश रावळ यांनी दिला. यावेळी रणथंब येथील सरपंच अर्जुन पाटील, उपसरपंच विलास बोदडे, विजय धनके, विकास शिंदे, एकनाथ डमाळे, शिवाजी धनके, संदीप डमाळे, बाळू वायाळ आदी शेतकरी उपस्थित होते.