सालीला प्रेग्नंट करणाऱ्या मेव्‍हण्याची 14 दिवसांच्‍या न्‍यायालयीन कोठडीत रवानगी

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः बायकोच्या 28 वर्षीय अविवाहित बहिणीवर सतत 4 महिने वारंवार बलात्कार करून तिला प्रेग्नंट करणाऱ्या मेव्हण्याची रवानगी न्यायालयाने 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत केली आहे. ही घटना चिखली तालुक्यातील एका गावात समोर आली होती. बलात्काराची कुठे वाच्यता केल्यास लहान्या बहिणीला सोडून देण्याची धमकी आरोपी पीडितेला देत होता. तिचे पोट दुखू लागल्याने तिला …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः  बायकोच्या 28 वर्षीय अविवाहित बहिणीवर सतत 4 महिने वारंवार बलात्‍कार करून तिला प्रेग्‍नंट करणाऱ्या मेव्‍हण्याची रवानगी न्‍यायालयाने 14 दिवसांच्‍या न्‍यायालयीन कोठडीत केली आहे. ही घटना चिखली तालुक्यातील एका गावात समोर आली  होती. बलात्‍काराची कुठे वाच्यता केल्यास लहान्‍या बहिणीला सोडून देण्याची धमकी आरोपी पीडितेला देत होता. तिचे पोट दुखू लागल्याने तिला रुग्णालयात दाखल करण्यात आल्यानंतर बलात्‍काराचा प्रकार समोर आला होता. या प्रकरणी चिखली पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल  करत अटक केली होती. 28 वर्षीय पीडिता आईसोबत राहते. तिची लहान बहीण लॉकडाऊनमुळे पतीची नोकरी गेल्याने पतीसह आईकडेच राहायला आली आहे. बायको आणि सासू नैसर्गिक विधीसाठी गेल्याची संधी साधून डिसेंबरमध्ये आरोपीने तिच्‍यावर बलात्‍कार केला होता. त्‍यानंतर धमक्‍या देऊन सतत बलात्‍कार करत राहिला. या प्रकरणी 8 मार्चला पोलिसांत तक्रार देण्यात आली आहे.