सावत्र लेकीकडून विनयभंगाच्या आरोपामुळे युवकाची आत्महत्या!;खामगावातील घटना

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः सावत्र मुलीने विनयभंगाची तक्रार दिल्याने अपमानित झालेल्या 37 वर्षीय युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना आज, 20 जुलै रोजी सकाळी खामगाव शहरातील जलंब रोड, ड्रीम लाईन सिटी रेल्वे पटरीजवळ उघडकीस आली. वाडी येथील जय मातादीनगरात राहणार्या 14 वर्षीय मुलीने तिच्या सावत्र पित्याविरोधात काल 19 जुलै रोजी शहर पोलीस ठाण्यात …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः सावत्र मुलीने विनयभंगाची तक्रार दिल्याने अपमानित झालेल्या 37 वर्षीय युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना आज, 20 जुलै रोजी सकाळी खामगाव शहरातील जलंब रोड, ड्रीम लाईन सिटी रेल्वे पटरीजवळ उघडकीस आली.

वाडी येथील जय मातादीनगरात राहणार्‍या 14 वर्षीय मुलीने तिच्या सावत्र पित्याविरोधात काल 19 जुलै रोजी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. सावत्र पित्याने वाईट उद्देशाने स्पर्श करून विनयभंग केल्याचे मुलीने तक्रारीत म्हटले होते.काल याप्रकरणी सावत्र बापाविरोधात गुन्हाही दाखल करण्यात आला होता. त्यामुळे अपमानित होऊन पित्याने आत्महत्या केल्याची चर्चा आहे.