सावधान व्हा! जिल्ह्यात आढळले एमआयएस- 6 चे तब्बल 45 रुग्ण!! डेल्टा प्लसचा मात्र एकही रुग्ण नाही; कोविड रुग्णालयांत बाल रुग्णांसाठी जागा राखीव , यंत्रणा अलर्ट मोडवर

बुलडाणा (संजय मोहिते ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः वैद्यकीय तज्ज्ञांनी नजीकच्या काळात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची व त्यात बालकांना जास्त धोका असल्याची शक्यता वर्तवली आहे. यामुळे जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवर आली असतानाच जिल्ह्यात आजवर एमआयएस- 6 च्या 45 रुग्णांची नोंद झाल्याची खळबळजनक माहिती हाती आली आहे. मात्र दुसरीकडे जिल्ह्यात आजवर डेल्टा प्लस या घातक स्टेनचा …
 

बुलडाणा (संजय मोहिते ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः वैद्यकीय तज्‍ज्ञांनी नजीकच्या काळात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची व त्यात बालकांना जास्त धोका असल्याची शक्यता वर्तवली आहे. यामुळे जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवर आली असतानाच जिल्ह्यात आजवर एमआयएस- 6 च्या 45 रुग्णांची नोंद झाल्याची खळबळजनक माहिती हाती आली आहे. मात्र दुसरीकडे जिल्ह्यात आजवर डेल्टा प्लस या घातक स्टेनचा एकही रुग्ण आढळून आला नसल्याचे दिलासादायक वृत्त आहे.

0 ते 19 वर्षे वयोगटातील बालकांना एमआयएस- 6 (मल्टीइस्टेन इन्फलानेटरी सिंड्रोम) या विषाणूचा धोका आहे. आजवरच्या काळात जिल्ह्यात 45 बालकांना हा विषाणूची बाधा झाल्याचे वरिष्ठ आरोग्य सूत्रांनी सांगितले. तसेच जिल्ह्यातील कोविड रुग्णालयातील बेड्‌स अशा बाल रुग्णांसाठी राखीव ठेवण्यात आले आहेत. बुलडाणा येथील महिला रुग्णालय, शेगाव व खामगाव सामान्य रुग्णालयातील प्रत्येकी 50 , इतर कोविड रुग्णालयांतील प्रत्येकी 20 बेडस राखीव राहणार आहे. तसेच त्यांच्यासाठी व्हेंटिलेटर आदी सुविधा राहणार आहे, दुसरीकडे जिल्हाधिकारी एस. रामामूर्ती यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा शल्य चिकित्सक नितीन तडस व जिल्हा आरोग्य अधिकारी बाळकृष्ण कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य यंत्रणांनी संभाव्य तिसऱ्या लाटेचा मुकाबला करण्यासाठी जय्यत तयारी केली आहे. जिल्ह्यात आजवर डेल्टा विषाणूचा एकही रुग्ण न सापडल्याने यंत्रणांना दिलासा मिळाला आहे.