सावधान! सध्या सुरू आहे नागांचा मिलनकाळ… सावळाजवळ 3 नागोबांना सर्पमित्राने दिले जीवनदान!

बुलडाणा (विशेष प्रतिनिधी) ः नाग म्हणा की कोब्रा म्हणा… या सरपटणाऱ्या महाविषारी जिवाच्या नुसत्या दर्शनाने जीवाचा थरकाप उडतो! असे हा नागराजा ( किंग कोब्रा) सध्या प्रेम, प्रणयात आकंठ बुडालेले आहेत. सध्या त्यांचा मिलन ( प्रजनन) काळ सुरू असल्याने ते जास्तच धोकादायक झाले आहेत. यामुळे जिह्याभरातील शेतकरी, शेतमजूर अन् नागरिकांनी सावध राहण्याची गरज आहे. शेतात, बांध, दाट झाडी, …
 

बुलडाणा (विशेष प्रतिनिधी) ः नाग म्हणा की कोब्रा म्हणा… या सरपटणाऱ्या महाविषारी जिवाच्या नुसत्या दर्शनाने जीवाचा थरकाप उडतो! असे हा नागराजा ( किंग कोब्रा) सध्या प्रेम, प्रणयात आकंठ बुडालेले आहेत. सध्या त्यांचा मिलन ( प्रजनन) काळ सुरू असल्याने ते जास्तच धोकादायक झाले आहेत. यामुळे जिह्याभरातील शेतकरी, शेतमजूर अन्‌ नागरिकांनी सावध राहण्याची गरज आहे.

शेतात, बांध, दाट झाडी, झुडुपे ही नागराजाची राहण्याची जागा. वर्षातले सात-आठ महिने एकट्याने राहणारे कोब्रा  वसंत ऋतूच्या आगमनप्रसंगी जोडीदार शोधतात. हा शोध पूर्ण झाला की मग ते एकांतात,  जगाचा विसर पडून एकमेकांत गुंतून जातात. मार्च- एप्रिल तर कधी मे मध्यावर त्यांचा हा सुखद काळ चालतो. यामुळे या काळात त्यांना थोडेही डिवचले, डिस्टर्ब केले की मग विचारता सोय नाही. यामुळे प्रामुख्याने शेतकऱ्यांनी या दिवसात शेतात काम करत असताना अति सावध राहिलेले बरं,असा सल्ला अभ्यासक व सर्पमित्र श्रीराम रसाळ यांनी बुलडाणा लाइव्‍हशी बोलताना दिला आहे. नुकतेच त्यांनी धोका पत्करून  नजीकच्या सावळा ( ता. बुलडाणा) येथील शेतकरी व मजुरांचा जीव वाचविला. एवढेच नव्हे तर 3 नागांचा जीवदेखील वाचविला. डॉ. भानुदास जगताप यांच्या शेता शेजारील शेतात लागोपाठ 2 दिवस त्यांनी 6 फूट लांब  नागांच्या जोडीला व एका नागाला पकडून जीवदान दिले.

…नर असतो आदर्श पती अन्‌ पिताही!
दरम्यान, हनिमून काळात निष्ठा जोपासणारा नर एक आदर्श पिताही असतो, असे सर्पमित्र रसाळ यांनी बुलडाणा लाईव्हसोबत बोलताना सांगितले. कमीअधिक साठ  दिवसांत नागीण 20 ते 25 अंडी देते. या अंड्यांचे व काही दिवसांनी बाहेर पडणाऱ्या पिल्लांचे नाग 24 तास प्राणपणाने रक्षण करतो. मम्मी ( नागीण) थोड्या वेळासाठी का होईना दूर जाईल पण डॅडी (नागोबा) उलसक बी हलत नाही, असे रसाळ म्हणाले. पिल्लं मोठी झाली की ती आणि ‘आई-बाबा’ देखील आपआपल्या दिशेने निघून जातात.