सासरवाडीवरून परतले, पाहतात तर चोरट्यांनी घर साफ केलेले…!; शेगाव शहरातील घटना

शेगाव (ज्ञानेश्वर ताकोते ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः शेगाव शहरात चोरीच्या घटना वाढतच आहेत. आळसणा रोडवरील श्रीकृपा रेसिडेन्सीमधील रहिवासी भानुदास लबडे यांचे घर चोरट्यांनी फोडले. ही घटना काल, १४ सप्टेंबर रोजी सायंकाळी समोर आली. याप्रकरणी शेगाव शहर पोलीस ठाण्यात रात्री उशिरा अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भानुदास लबडे हे ८ सप्टेंबर रोजी कुटूंबियांसह …
 
सासरवाडीवरून परतले, पाहतात तर चोरट्यांनी घर साफ केलेले…!; शेगाव शहरातील घटना

शेगाव (ज्ञानेश्वर ताकोते ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः शेगाव शहरात चोरीच्या घटना वाढतच आहेत. आळसणा रोडवरील श्रीकृपा रेसिडेन्सीमधील रहिवासी भानुदास लबडे यांचे घर चोरट्यांनी फोडले. ही घटना काल, १४ सप्टेंबर रोजी सायंकाळी समोर आली. याप्रकरणी शेगाव शहर पोलीस ठाण्यात रात्री उशिरा अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भानुदास लबडे हे ८ सप्टेंबर रोजी कुटूंबियांसह जळगाव जामोद येथे सासरवाडीला गेले होते. काल, १४ सप्टेंबर रोजी सायंकाळी ते परतले असता त्यांना घराचा दरवाजा तुटलेला दिसला. घरातील बेडरूममधील कपाटातील नगदी ३० हजार रुपये, देवघरातील चांदीचे ताट, कपाटातील तीन जुने मोबाइल असा एकूण ६५ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेल्याची तक्रार लिबडे यांनी पोलीस ठाण्यात दिली आहे.