सासरा, साल्यांनी माझ्या घराचा सत्‍यानाश केला!; सुसाईड नोट लिहून जावयाने उचलले टोकाचे पाऊल; पोलिसांनी ३ महिन्यांनी केला गुन्‍हा दाखल

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः ५५ वर्षीय व्यक्तीने सासऱ्याच्या शेतात विष प्राशन करून आत्महत्या केली. ही घटना ४ जून २०२१ रोजी तळणी (ता. मोताळा) येथे घडली होती. आज, १० सप्टेंबर रोजी या आत्महत्येप्रकरणी मृतकाच्या सासरा व साल्याविरोधात बोराखेडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मोताळा येथील महादेव रामभाऊ सोनोने (५५) यांनी त्यांचे सासरे प्रल्हाद …
 
सासरा, साल्यांनी माझ्या घराचा सत्‍यानाश केला!; सुसाईड नोट लिहून जावयाने उचलले टोकाचे पाऊल; पोलिसांनी ३ महिन्यांनी केला गुन्‍हा दाखल

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः ५५ वर्षीय व्यक्तीने सासऱ्याच्या शेतात विष प्राशन करून आत्महत्या केली. ही घटना ४ जून २०२१ रोजी तळणी (ता. मोताळा) येथे घडली होती. आज, १० सप्टेंबर रोजी या आत्महत्येप्रकरणी मृतकाच्या सासरा व साल्याविरोधात बोराखेडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोताळा येथील महादेव रामभाऊ सोनोने (५५) यांनी त्यांचे सासरे प्रल्हाद कंठाडे यांच्या शेतात विष प्राशन केल्याची घटना ४ जून रोजी संध्याकाळी ५ वाजता घडली होती. घटनेची माहिती मिळताच बोराखेडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला होता. मृतकाच्या खिशात चिठ्ठी आढळून आली होती. त्यात सासरा प्रल्हाद कठांडे, साळा गजानन कठांडे व सुनील कठांडे यांनी माझ्या घराचा सत्यानाश केला, असे लिहिलेले होते. पोलिसांनी त्यानंतर तपास करून अनेकांची चौकशी केली.

चौकशीअंती बोराखेडी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक प्रल्हाद वानखेडे यांनी याप्रकरणाची तक्रार दिली. तक्रारीवरून मृतकाचा सासरा प्रल्हाद विठोबा कठांडे, साला गजानन कठांडे व सुनील कठांडे (सर्व रा. तळणी, ता. मोताळा) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.