सासरी निघालेली विवाहिता ‘मध्येच’ गायब!

खामगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः सासरी जाते असे सांगून माहेरावरून निघालेली विवाहिता मध्येच गायब झाली आहे. तिच्या वडिलांनी ती हरवल्याची तक्रार आज, 21 मे रोजी पिंपळगाव राजा (ता. खामगाव) पोलीस ठाण्यात दिली आहे. पिंपळगाव राजा येथील प्रकाश किसन टफ (55) यांची मुलगी लक्ष्मी पारधी (35) ही 15 मे रोजी सासरी जाते असे सांगून पिंपळगाव राजा …
 

खामगाव (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः सासरी जाते असे सांगून माहेरावरून निघालेली विवाहिता मध्येच गायब झाली आहे. तिच्‍या वडिलांनी ती हरवल्याची तक्रार आज, 21 मे रोजी पिंपळगाव राजा (ता. खामगाव) पोलीस ठाण्यात दिली आहे.

पिंपळगाव राजा येथील प्रकाश किसन टफ (55) यांची मुलगी लक्ष्मी पारधी (35) ही 15 मे रोजी सासरी जाते असे सांगून पिंपळगाव राजा येथून टाकळी तलाव येथे जाण्यास निघाली होती. मात्र ती सासरी पोहोचलीच नाही. नातेवाइकांनी तिचा सगळीकडे शोध घेतला. मात्र ती कुठेच मिळून आली नाही. अखेर तिच्‍या वडिलांनी पोलिसांत तक्रार दिली.