सासूच्या छेडछाडीचा बदला जावयाने घेतला, रुम्‍हणा येथील शेतकऱ्याच्‍या खुनाचे कारण

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः सासूच्या छेडछाडीचा बदला जावयाने 4 वर्षांनंतर घेतला. रुम्हणा (ता. सिंदखेड राजा ) येथील रंगनाथ तुकाराम खेडकर या 53 वर्षीय शेतकऱ्याच्या खुनाचा हे कारण समोर आले आहे. तसा कबुलीजबाब पोलिसांनी अटक केलेल्या तरुणाने दिला आहे. 3 जून रोजी पैनगंगा नदीत पेनसावंगीजवळ (ता. चिखली) रंगनाथ खेडकर यांचा मृतदेह हातपाय बांधलेला, पोटाला दगड …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः सासूच्‍या छेडछाडीचा बदला जावयाने 4 वर्षांनंतर घेतला. रुम्‍हणा (ता. सिंदखेड राजा ) येथील रंगनाथ तुकाराम खेडकर या 53 वर्षीय शेतकऱ्याच्‍या खुनाचा हे कारण समोर आले आहे. तसा कबुलीजबाब पोलिसांनी अटक केलेल्या तरुणाने दिला आहे.

3 जून रोजी पैनगंगा नदीत पेनसावंगीजवळ (ता. चिखली) रंगनाथ खेडकर यांचा मृतदेह हातपाय बांधलेला, पोटाला दगड बांधलेल्‍या अवस्‍थेत वाहून आला होता. 31 मेपासून ते बेपत्ता होते. या प्रकरणात अमडापूर पोलिसांनी भरत प्रल्हाद जायभाये (रा. जागदरी), अंकुश शिवाजी डोईफोडे (19, रा. जागदरी), सचिन गजानन काळुशे (22, रा. जागदरी) या तिघांना ताब्‍यात घेतले आहे. त्‍यांच्‍या चौकशीतून संपूर्ण घटनाक्रम समोर आला. त्‍यांनी 30 मे रोजी विठ्ठल देशमुख (रा. सवडद) यांचा मोबाइल हिसकावून घेत रंगनाथ खेडकर यांना कॉल केला होता. मी सिंदखेड राजा येथून कृषी अधिकारी बोलतोय. तुमची पीक विम्याची कागदपत्रे कमी आहेत.

तुम्‍ही पांग्री उगले फाट्याजवळ या, असे त्‍यांना सांगितले. खेडकर हे पांग्री उगले फाट्यावर येताच आरोपींनी त्‍यांना कारमध्ये टाकले. गाडीत गळ्याला दोर आवळून मारून टाकले. त्‍यांचा मृतदेह पेनटाकळी धरणाच्‍या पुलावरून धरणात दगडदोरी बांधून फेकला. भरत जायभाये याने कबुली दिली की, त्‍याची सासरवाडी रुम्‍हणा असून, रंगनाथ खेडेकर यांनी 4 वर्षांपूर्वी त्‍याच्‍या सासूची छेड काढली होती. त्‍याचा राग मनात धरून त्‍याने खेडेकर यांना कायमचे संपविण्याचा कट आखला. घटनेचा तपास आणि कारवाई ठाणेदार अमित वानखडे, पोलीस उपनिरिक्षक श्री. सोनुने, एएसआय आयुब खान, परमेश्वर शिंदे, गजानन राजपूत, पो.काँ. सुनील राठोड यांनी केली.