सासूने चहा मागितला, सुनेने डोक्यात काठी घातली; खामगावातील घटना

खामगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः सासूने सुनेला चहा मागितला. सुनेने चहा तर दिलाच नाही उलट सासूच्या डोक्यात काठी घातली. खामगाव शहरातील शिवाजी वेस भागात आज, १ सप्टेंबर रोजी सकाळी ही घटना घडली. गजानन देशमुख (रा. शिवाजी वेस) यांनी त्यांच्या भावजयीविरोधात याप्रकरणी तक्रार दिली आहे. तक्रारीनुसार देशमुख यांची आई कौशल्याबाई देशमुख (७७) यांनी त्यांची सून रेखा …
 
सासूने चहा मागितला, सुनेने डोक्यात काठी घातली; खामगावातील घटना

खामगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः सासूने सुनेला चहा मागितला. सुनेने चहा तर दिलाच नाही उलट सासूच्या डोक्यात काठी घातली. खामगाव शहरातील शिवाजी वेस भागात आज, १ सप्टेंबर रोजी सकाळी ही घटना घडली.

गजानन देशमुख (रा. शिवाजी वेस) यांनी त्यांच्या भावजयीविरोधात याप्रकरणी तक्रार दिली आहे. तक्रारीनुसार देशमुख यांची आई कौशल्याबाई देशमुख (७७) यांनी त्यांची सून रेखा नीलेश देशमुख हिला चहा मागितला. त्यावेळी सुनेने चहा देण्याऐवजी सासूला काठीने मारहाण केली व शिविगाळ केली. त्यामुळे सासूचे डोके फुटले. तक्रारीवरून सून रेखाविरुद्ध शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.