सिंदखेड राजात कोविड समर्पित हॉस्पिटलची पालकमंत्र्यांकडून पाहणी

सिंदखेड राजा (बाळासाहेब भोसले ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः सिंदखेड राजा तालुका मुख्यालयात कोविड समर्पित हॉस्पिटलची निर्मिती सुरू आहे. या नवीन होत असलेल्या कोविड समर्पित हॉस्पिटलची पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी पाहणी करून स्थानिक प्रशासनाला सूचना देऊन युद्धपातळीवर लवकरात लवकर काम पूर्ण करण्याची आदेश दिले. सिंदखेडराजा तालुक्यातील नागरिकांची खूप दिवसांपासून तालुका मुख्यालयात अत्याधुनिक कोविड हॉस्पिटल …
 

सिंदखेड राजा (बाळासाहेब भोसले ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा)  ः सिंदखेड राजा तालुका मुख्यालयात कोविड समर्पित हॉस्पिटलची निर्मिती सुरू आहे.  या नवीन होत असलेल्या कोविड समर्पित हॉस्पिटलची पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी पाहणी करून स्थानिक प्रशासनाला सूचना देऊन युद्धपातळीवर लवकरात लवकर काम पूर्ण करण्याची आदेश दिले.

सिंदखेडराजा तालुक्यातील नागरिकांची खूप दिवसांपासून तालुका मुख्यालयात अत्याधुनिक कोविड हॉस्पिटल होण्याची मागणी होती. ही मागणी पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या माध्यमातून पूर्णत्वास जात असून, लवकरच पुरातत्व विभागाच्या वस्तुसंग्रहालयात 100  बेडच्‍या कोविड हॉस्पिटलचा लोकार्पण सोहळा होणार आहे. या हॉस्पिटलमध्ये एकूण 30 ऑक्सिजन बेड असून 70 सर्वसाधारण बेड आहेत तर महिलांसाठी विशेष कोविड कक्षाची निर्मिती करण्यात आली आहे. लहान मुलांसाठी नवीन कक्ष सुरू करण्याचे आदेश पालकमंत्र्यांनी प्रशासनाला दिले.

तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका लक्षात घेता प्रशासनाने तयारीत राहण्याचे निर्देश पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी प्रशासनाला दिले आहेत. यावेळी अतिरिक्त जिल्हाधिकारी श्री. गोगटे,  जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रशांत पाटील, उपविभागीय अधिकारी सुभाष दळवी, तहसीलदार सुनील सावंत, ठाणेदार जयवंत सातव , शिवाजीराजे जाधव, संजय मेहेत्रे, गजानन पवार,  ग्रामीण रुग्णालयाच्या अधीक्षिका डॉ. सुनिता बिराजदार, डॉ. सुभाष दराडे, नगर परिषदेचे वरिष्ठ लिपिक श्री. नेमाडे यांच्यासह अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.