सिंदखेड राजात पशुवैद्यकीय विभागाच्‍या अजब-गजब कारनाम्‍यांमुळे शेतकरी हैराण…!

सिदखेडराजा (बाळासाहेब भोसले ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः सिंदखेड राजा पंचायत समिती अंतर्गत येणारा पशुवैद्यकीय विभाग सध्या आपल्या एक अनेक कारनाम्यांमुळे चर्चेत आला आहे. शेतकऱ्यांची लूट राजरोस केली जात असताना या विभागाने अधिकारी मात्र डोळ्यांवर जणू पट्टी बांधून आहेत. त्यामुळे आधी वैतागलेल्या शेतकऱ्यांच्या त्रासात भर पडत आहे. असे कारनामे…अशी डोळेझाक… पंचायत समिती अंतर्गत पशुवैद्यकीय विभागाला …
 

सिदखेडराजा (बाळासाहेब भोसले ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः सिंदखेड राजा पंचायत समिती अंतर्गत येणारा पशुवैद्यकीय विभाग सध्या आपल्या एक अनेक कारनाम्‍यांमुळे चर्चेत आला आहे. शेतकऱ्यांची लूट राजरोस केली जात असताना या विभागाने अधिकारी मात्र डोळ्यांवर जणू पट्टी बांधून आहेत. त्‍यामुळे आधी वैतागलेल्या शेतकऱ्यांच्‍या त्रासात भर पडत आहे.

असे कारनामे…अशी डोळेझाक…

  • पंचायत समिती अंतर्गत पशुवैद्यकीय विभागाला मुख्यमंत्री पशु स्वास्थ्य योजनेतून फिरता पशुवैद्यकीय दवाखाना व्हॅन (एमएच 12 एसी 4194) मिळाली. मात्र 16 फेब्रुवारीपासून ही व्हॅन एका जागी उभी असून, धुळ खात आहे. महाराष्ट्र शासनाने लाखो रुपये खर्चून ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसाठी ही व्‍हॅन उपलब्‍ध करून दिली. मात्र अधिकाऱ्यांच्‍या हलगर्जीपणामुळे व्‍हॅनचा अजूनही उपयोग होत नसल्याचे चित्र आहे.
  • सिंदखेड राजा तालुक्यातील काही भागांत दोन महिन्यापूर्वी टॅगिंग व लसीकरण करण्यात आले. शासनाचे हे लसीकरण खासगी लोकांकडून करून घेऊन या लसीकरणासाठी दहा रुपये टॅगिंगचे व दहा रुपये लसीकरणाचे असे वीस रुपये शेतकऱ्यांकडून घेण्यात आले. मात्र ही लस व टॅगिंग मोफत शासनाने देण्याचा निर्णय घेतलेला असताना सुद्धा त्या शेतकऱ्यांकडून पैसे उकळण्यात आले.
  • अनेक वेळा पशुवैद्यकीय विभागाचे कार्यालय बंद असते. संबंधित अधिकाऱ्यांचे कामाचे तीन दिवस देऊळगावराजा व तीन दिवस सिदखेडराजा असे आहेत, हे विशेष.
  • पशूंना कृत्रिम रेतनाचे 300 ते 350 रुपये घेतले जातात. वास्तविक 40 रुपये घेऊन कृत्रिम रेतन करून देण्याचा नियम आहे. हा नियम असताना सुद्धा कास्तकारांना जास्तीचा भुर्दंड सोसावा लागतो. याला जबाबदार कोण? असा प्रश्न शेतकरी करत आहेत. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देण्याची गरज व्‍यक्‍त होत आहे.