सिंदखेड राजात व्‍यापारी उतरले रस्‍त्‍यावर!

सिंदखेड राजा (बाळासाहेब भोसले ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः कडक निर्बंधांत अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद करण्याचे आदेश असल्याने बाजारपेठ बंद होती. मात्र आधीच कोरोनामुळे अडचणीत आलेल्या व्यापाऱ्यांनी सिंदखेड राजामध्ये रस्त्यावर उतरत तहसीलदार आणि नगरपरिषद मुख्याधिकाऱ्यांना हात जोडले. सकाळी 9 ते सायंकाळी 5 पर्यंत दुकाने सुरू ठेवण्यास परवानगी द्यावी. आमचे हाल जिल्हाधिकारी आणि मुख्यमंत्र्यांपर्यंत …
 

सिंदखेड राजा (बाळासाहेब भोसले ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः कडक निर्बंधांत अत्‍यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद करण्याचे आदेश असल्याने बाजारपेठ बंद होती. मात्र आधीच कोरोनामुळे अडचणीत आलेल्या व्‍यापाऱ्यांनी सिंदखेड राजामध्ये रस्‍त्‍यावर उतरत तहसीलदार आणि नगरपरिषद मुख्याधिकाऱ्यांना हात जोडले. सकाळी 9 ते सायंकाळी 5 पर्यंत दुकाने सुरू ठेवण्यास परवानगी द्यावी. आमचे हाल जिल्हाधिकारी आणि मुख्यमंत्र्यांपर्यंत कळवावे, अशी विनंती केली.

आज, 6 एप्रिलला सकाळी सर्व व्यावसायिक एकत्र आले. त्‍यांनी निर्बंध शिथिल करण्याची मागणी केली. लॉकडाऊनमुळे व्यवसाय बंद पडले आहेत. दुकानदारांवर उपासमारीची वेळ आली आहे. बँकेचे कर्ज व दुकानाचे भाडे देणे अवघड झाले आहे, असे गाऱ्हाणे व्यापाऱ्यांनी तहसीलदार सुनील सावंत यांच्‍याकडे मांडले. यावेळी राजेंद्र अंभोरे, वैभव मिनासे, नितीन चौधरी, संजय चौधरी, विष्णू ठाकरे, रामेश्वर ठाकरे यांच्यासह सिंदखेड राजातील व्यापारी, छोटे-मोठे दुकानदार हजर होते.