सिंदखेड राजा ः प्रधानमंत्री सुरक्षा योजना…. वारस पत्‍नीला वीस लाख रुपयाचा चेक!

सिंदखेडराजा (बाळासाहेब भोसले ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा)ः केंद्र शासनाकडून सुरू करण्यात आलेली प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना व भारतीय स्टेट बँकेची वैयक्तिक अपघाती विमा योजना मोलाची भूमिका बजावते आहे. कुटुंबातील प्रमुख व्यक्तीचा अपघाती मृत्यू झाल्यास प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना अंतर्गत दोन लाख व भारतीय स्टेट बँकेच्या वैयक्तिक अपघाती विमा योजनेत २० लाख मिळवून देणारी ही योजना …
 

सिंदखेडराजा (बाळासाहेब भोसले ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा)ः  केंद्र शासनाकडून सुरू करण्यात आलेली प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना व भारतीय स्टेट बँकेची वैयक्तिक अपघाती विमा योजना मोलाची भूमिका बजावते आहे. कुटुंबातील प्रमुख व्यक्तीचा अपघाती मृत्यू झाल्यास प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना अंतर्गत दोन लाख व भारतीय स्टेट बँकेच्या वैयक्तिक अपघाती विमा योजनेत २० लाख मिळवून देणारी ही योजना सर्वसामान्य कुटुंबांना दिलासा देणारी ठरतेय. चांगेफळ येथील सवडे कुटुंबीयांना याच अपघात विम्याच्या आधारे २२ लाख रुपयांचा धनादेश येथील भारतीय स्टेट बँक शाखेने नुकताच वितरित केला आहे.

चांगेफळ येथील ज्ञानेश्वर शेषराव सवडे हे ३० ऑगस्ट २०२० रोजी खेडोपाडी भाजीपाला विक्रीसाठी गेले होते. दुचाकीवरून घरी परतताना पाण्याच्या पाटावरून घसरून त्यांचा अपघात झाला. यात त्यांचा मृत्यू झाला. ज्ञानेश्वर सवडे यांनी प्रधानमंत्री सुरक्षा विमा (१२ रूपये) व भारतीय स्टेट बँक वैयक्तिक अपघात विमा (१००० रुपये) योजना घेतल्या होत्या. त्यानुसार अंतकला ज्ञानेश्वर सवडे यांना पती ज्ञानेश्वर सवडे यांनी काढलेल्या प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेतून २ लाख व भारतीय स्टेट बँक वैयक्तिक अपघात विमा योजनेतुन २० लाख असा एकूण २२ लाख रुपयांचा धनादेश बुलडाणा मुख्य प्रबंधक विजयकुमार दीपक व अशोक वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली शाखा व्यवस्थापक अभिजित वि. वाजपे यांनी वितरित केला. यावेळी समाधान सवडे, एकनाथ सोनुने, गौतम गवई व इतर उपस्थित होते.