सिंदखेड राजा तालुक्‍यातील 3 गावे दोन दिवसांपासून अंधारात, महावितरणचे दूर्लक्ष!

मलकापूर पांग्रा (अमोल साळवे ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः महावितरणच्या भोंगळ कारभारामुळे सिंदखेड राजा तालुक्यातील मलकापूर पांग्रा, झोटिंगा, देऊळगाव कोळ ही गावे गेली दोन दिवस अंधारात राहिली. आजही तांत्रिक बिघाड दुरुस्त न झाल्याने दुपारपर्यंत वीज नव्हती. यामुळे तिन्ही गावांचे नागरिक संतप्त झाले असून, त्यांनी महावितरणच्या मलकापूर पांग्रा येथील कार्यालयाला कुलूप ठोकण्याचा इशारा दिला आहे. आठ …
 

मलकापूर पांग्रा (अमोल साळवे ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः महावितरणच्‍या भोंगळ कारभारामुळे सिंदखेड राजा तालुक्यातील मलकापूर पांग्रा, झोटिंगा, देऊळगाव कोळ ही गावे गेली दोन दिवस अंधारात राहिली. आजही तांत्रिक बिघाड दुरुस्‍त न झाल्‍याने दुपारपर्यंत वीज नव्‍हती. यामुळे तिन्‍ही गावांचे नागरिक संतप्‍त झाले असून, त्‍यांनी महावितरणच्‍या मलकापूर पांग्रा येथील कार्यालयाला कुलूप ठोकण्याचा इशारा दिला आहे. आठ दिवसांत या ठिकाणी कायमस्‍वरुपी लाइनमन द्यावा अन्यथा बेमुदत उपोषण करण्यात येईल, असा इशाराही त्‍यांनी दिला.

झाडांमुळे अनेकदा विजेची तार तुटते आणि दिवसातून अनेकदा वीजपुरवठा खंडित झाल्‍याच्‍या घटना घडल्‍या आहेत. शिवाय बहुतांश खांब वाकलेले आहेत. शेतातील वीज पुरवठा चार दिवसांपासून  खंडित असल्याने पिकांचे नुकसान होत आहे, शिवाय जनावरांनाही पाणी पाजण्यासाठी शेतकऱ्यांचे हाल होत आहेत. महावितरण कंपनीचे अधिकारी व कर्मचारी याकडे दूर्लक्ष करत असल्याचा आरोप गावकरी  करत आहेत.

 काही दिवसांअगोदर खांबावर चिटकून मलकापूर पांग्रा येथील पाणी पुरवठा कर्मचार्‍याचा मृत्‍यू झाला होता. तेव्हापासून या गावांमध्ये महावितरणचे कर्मचारी येत नसल्यामुळे गावकऱ्यांना स्वतःच नाईलाजाने लाईनची कामे करावी लागत आहेत. गावातील वीजपुरवठा खंडित झाल्याने सिद्धेश्वर वायाळ (वाघाळा), अमोल कायंदे (झोटिंगा), परमेश्वर आटोळे, प्रदीप दानवे यांनी विद्युत पुरवठा पूर्ववत सुरू केला. दरम्यान, मलकापूर पांग्रा येथे तात्काळ नवीन गावठाण फिडर सुरू करण्यात यावे. प्रत्येक रोहित्रावर एबी स्‍वीच बसवावा तसेच मलकापूर पांग्रापासून देऊळगाव कोळ, झोटिंगा वेगळे करण्यात यावे, अशी मागणी यावेळी माजी सरपंच अहमद यारखाँ पठाण, ग्रा. पं. सदस्य नामदेव उगले, बद्रीनाथ काळे, राजू साळवे, भागवत देशमुख, बुढण चौधरी, जलील सायकल वाले यांनी केली आहे.