‘सिंह’ आला पण ‘गड’ गेला! अर्ध्या कर्मचाऱ्यांवर उपचार, अर्ध्यावर तहसीलचा डोलारा!!

बुलडाणा (संजय मोहिते ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जिल्हा मुख्यालय असलेल्या बुलडाणा तहसीलमधील 3 कर्मचारी 4 मार्चला कोरोना पॉझिटिव्ह आले अन् दोघांत लक्षणे आढळून आली. तेव्हाच अनेकांच्या मनात शंकेची पाल चुकली! वर्तमानात राहताना भविष्याचा अचूक वेध घेत सर्वांना सावध करणाऱ्या बुलडाणा लाईव्हने सुद्धा भाकीत वजा आशंका व्यक्त केली. दुर्दैवाने या शंका खऱ्या ठरल्या आहेत. यात …
 

बुलडाणा (संजय मोहिते ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः जिल्हा मुख्यालय असलेल्या बुलडाणा तहसीलमधील 3 कर्मचारी 4 मार्चला कोरोना पॉझिटिव्ह आले अन्‌ दोघांत लक्षणे आढळून आली. तेव्हाच अनेकांच्या मनात शंकेची पाल चुकली! वर्तमानात राहताना भविष्याचा अचूक वेध घेत सर्वांना सावध करणाऱ्या बुलडाणा लाईव्हने सुद्धा भाकीत वजा आशंका व्यक्त केली. दुर्दैवाने या शंका  खऱ्या ठरल्या आहेत. यात थोडाफार दिलासा म्हणजे  बातमीचे मुख्य शीर्षक.

यातील ‘सिंह’ म्हणजे तहसीलदार रुपेश खंडारे अन्‌ गड म्हणजे तहसील कार्यालय होय!  कारण सुदैवाने तहसीलदारांचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आलाय! बुलडाण्यात रुजू झाल्यापासून कोरोनाशी हिंमतीने दोन हात करणाऱ्या श्री. खंडारे यांनी कोरोनाला सातेक महिने तहसीलपासून दूर ठेवले. तसेच रस्त्यावर उतरून दंडात्मक कारवायांचा धडाका लावला. कोरोनाचे पुनरागमन होण्यापूर्वी त्यांनी आठवड्यातच चार लाखांवर दंड वसूल केला. 51 ग्रामपंचायतींच्या निवडणुकांत सर्वोतोपरी खबरदारी घेतली. 18 जानेवारीला निकाल लागले. त्यावेळी तहसील हाऊसफुल्ल असतानाही  कोरोना तहसीलपासून अलिप्त राहिला. यामुळे कोरोनविरुद्ध सर्व दक्षता पाळून लढणारे तहसीलदार निगेटिव्ह येणे ही खूप वाईटमधील थोडे चांगले, अशी बाब ठरली आहे. याचे कारण कॅप्टन जायबंदी म्हणजे सर्व टीम जखमी अन्‌ मनोधैर्य खचलेली!  मात्र हा दिलासा किरकोळ ठरावा असाच आहे. याचे कारण अगोदरच तहसीलमध्ये रिक्त पदे भरपूर. त्यामुळे 35 कर्मचाऱ्यांवर कार्यालयाचा डोलारा. आता त्यातील तब्बल 18 जण पॉझिटिव्ह आल्यामुळे सुमारे 17 कर्मचाऱ्यांवर कामकाजाचा बोजा पडला आहे. त्यांच्यावर उपचार सुरू असल्याने ते किमान 14 दिवस रुजू  होणार नाहीत. यामुळे ही घडामोड दुर्दैवाने रेकॉर्डब्रेक असली तरी तो तहसीलच्या आजवरच्या इतिहासातील काळा अध्याय आहे. अदृश्य शत्रूच्या हल्ल्यातून बचावलेले ‘सिंह’ आपल्या गडाचा व फौजेचा कसा बचाव करतात याकडे सर्वसामान्य व प्रशासकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.