सिल्लोडचा युवक देऊळगाव राजात येऊन अंधारात लपला!

देऊळगाव राजा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः बसस्थानकासमोरील किराणा दुकानाजवळ अनिल किसन कुदळ (३३, रा. शनि मंदिरजवळ, त्रिवेणी गल्ली, सिल्लोड) हा अंधारात लपला होता. पोलिसांना पाहताच पुन्हा लपण्याचा प्रयत्न करू लागला. त्यामुळे संशय आला अन् पोलिसांनी ताब्यात घेऊन त्याची झडती घेतली. झडतीत काही मिळाले नाही पण चोरीच्या उद्देशानेच त्याचे कृत्य असल्याने त्याच्याविरुद्ध कारवाई करण्यात आली. ही …
 
सिल्लोडचा युवक देऊळगाव राजात येऊन अंधारात लपला!

देऊळगाव राजा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः बसस्‍थानकासमोरील किराणा दुकानाजवळ अनिल किसन कुदळ (३३, रा. शनि मंदिरजवळ, त्रिवेणी गल्ली, सिल्लोड) हा अंधारात लपला होता. पोलिसांना पाहताच पुन्‍हा लपण्याचा प्रयत्‍न करू लागला. त्‍यामुळे संशय आला अन्‌ पोलिसांनी ताब्‍यात घेऊन त्‍याची झडती घेतली. झडतीत काही मिळाले नाही पण चोरीच्या उद्देशानेच त्‍याचे कृत्‍य असल्याने त्‍याच्‍याविरुद्ध कारवाई करण्यात आली. ही घटना आज, १६ ऑक्‍टोबरला पहाटे अडीचच्‍या सुमारास (मध्यरात्री) देऊळगाव राजा येथे घडली.

पोकाँ रवींद्र नरोटे यांनी या शेख जल्लीलविरुद्ध तक्रार दिली आहे. ते होमगार्ड समाधान विष्णू घुगे यांच्‍यासह रात्रीची गस्‍त घालत होते. पहाटे अडीचला शेख जल्लील अब्दुल सत्तार (रा. बागवान काॅलनी, देऊळगावराजा) यांनी माहिती दिली, की एक अनोळखी व्‍यक्‍ती त्‍यांच्‍या बसस्‍थानकासमोरील किराणा दुकानाजवळ अंधारात लपून बसला आहे. त्‍यामुळे श्री. नरोटे आणि श्री. घुगे त्‍या ठिकाणी गेले. त्‍यांना पाहून अनिल आणखीनच अंधारात लपू लागला. त्‍याला शिताफीने पकडून रोडवर लाइटाच्‍या उजेडात आणून विचारणा करण्यात आली. त्याने नाव अडखळत व घाबरत सांगितले. त्यास देऊळगाव राजात येण्याचे कारण विचारले. मात्र त्याने उडवा उडवीचे उत्तरे दिली. अंग झडतीत त्याच्‍याजवळ कोणतीही मौल्यवान वस्तू मिळाली नाही.