सीम अपडेट करायचे म्‍हणाला अन्‌ 97 हजार घेऊन गेला…!; शेगावमध्ये शिक्षकाला ऑनलाइन गंडा

शेगाव (ज्ञानेश्वर ताकोते ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः तुमचे सीम अपडेट करायचे असून, मोबाइलमध्ये हे दोन अॅप डाऊनलोड करा, असे सांगून ॲप डाऊनलोड केल्यानंतर शिक्षकाच्या खात्यातून तब्बल 97 हजार 916 रुपये भामट्याने उडविल्याची धक्कादायक घटना 1 जून रोजी शेगावमध्ये समोर आली आहे. शिक्षकाने आज, 3 जून रोजी शहर पोलीस ठाण्यात या प्रकरणी तक्रार दिली. त्यावरून …
 

शेगाव (ज्ञानेश्वर ताकोते ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः तुमचे सीम अपडेट करायचे असून, मोबाइलमध्ये हे दोन अ‍ॅप डाऊनलोड करा, असे सांगून ॲप डाऊनलोड केल्यानंतर शिक्षकाच्‍या खात्‍यातून तब्‍बल 97 हजार 916 रुपये भामट्याने उडविल्याची धक्कादायक घटना 1 जून रोजी शेगावमध्ये समोर आली आहे. शिक्षकाने आज, 3 जून रोजी शहर पोलीस ठाण्यात या प्रकरणी तक्रार दिली. त्‍यावरून पोलिसांनी गुन्‍हा दाखल केला आहे. शिक्षक एसबीआय कॉलनी परिसरातील सूर्योदयनगरात राहतात.

या शिक्षकाच्‍या मुलाच्‍या मोबाइलवर 1 जून रोजी दुपारी दीडच्‍या सुमारास अनोळखी व्‍यक्‍तीचा कॉल आला. जिओ कस्टमर केअर असे मोबाइलवर आल्याने त्याने तो फोन उचलला. फोन उचलल्यानंतर त्या अनोळखी व्‍यक्‍तीने तुमचे जिओ सीम अपडेट करायचे आहे, असे सांगितले. quick and support आणि automatic sms to phone असे दोन अ‍ॅप डाऊनलोड करायला समोरच्‍या व्‍यक्‍तीने सांगितले. त्यानुसार त्याने मोबाइलमध्ये ते दोन्ही अ‍ॅप डाऊनलोड केले. नंतर त्या अनोळखी व्‍यक्‍तीने 10 रुपये सेंड कर, असे सांगितल्याने मुलाने माय जिओ अ‍ॅपवरून 10 रुपये पाठवले. पण ते सेन्ड झाले नाहीत. मात्र सायबर चोरट्याने डाऊनलोड केलेल्या दोन्ही ॲपच्‍या साह्याने मोबाइलमधील डेटा हॅक करून शिक्षकांच्‍या स्टेट बँक ऑफ इंडियाच्‍या शेगाव शाखेच्या एटीएम कार्डवरून माय जिओ अ‍ॅप वापरून सुरुवातीला दुपारी 2.30 वाजता 13,999 रुपये व नंतर थोड्या वेळाने 9,999 रुपये असे एकूण 23,998 रुपये काढले. नंतर 19,910, 19,999, 19,999, 5000, 5000, 4000 असे 73,908 रुपये दुपारी 02.49 ते 03.00 वाजता दरम्यान गायब केले. असे एकूण 97,906 रुपये एकाच दिवशी भामट्याने उडवले. हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्‍या व्‍यक्‍तीशी संपर्क करण्याचा प्रयत्‍न केला असता त्याने मोबाइल बंद केल्याचे आढळले. घटनेचा तपास शेगाव पोलीस करत आहेत.