सुखद ब्रेकिंग! भूसंपादनाची कार्यालये येणार एकाच छताखाली!! स्वनिधीतून बांधण्यात येणारी पश्चिम विदर्भातील प्रथम इमारत; कर्मचाऱ्यांसह प्रकल्पग्रस्तांची अडचण होणार दूर; उपजिल्हाधिकारी अहिरे यांचे प्रयत्न ठरणार जिल्हा कचेरीचे “भूषण’

बुलडाणा (संजय मोहिते ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जिल्हाधिकारी कार्यालयात तीन कोपऱ्यांत असलेली आणि हजारो प्रकल्पग्रस्तांसह कर्मचाऱ्यांना अडचणीची ठरणारी भूसंपादन विभागाची तीन कार्यालये लवकरच एकाच छताखाली येणार आहेत! होय, मावळते उप जिल्हाधिकारी ( भूसंपादन) भूषण अहिरे यांच्या अहिर्निश प्रयत्न व जिल्हाधिकारी एस. रामामूर्ती यांच्या पाठबळ, पाठपुरावा यामुळे जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात टोलेजंग व देखणी प्रशासकीय इमारत …
 
सुखद ब्रेकिंग! भूसंपादनाची कार्यालये येणार एकाच छताखाली!! स्वनिधीतून बांधण्यात येणारी पश्चिम विदर्भातील प्रथम इमारत; कर्मचाऱ्यांसह प्रकल्पग्रस्तांची अडचण होणार दूर; उपजिल्हाधिकारी अहिरे यांचे प्रयत्न ठरणार जिल्हा कचेरीचे “भूषण’

बुलडाणा (संजय मोहिते ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जिल्हाधिकारी कार्यालयात तीन कोपऱ्यांत असलेली आणि हजारो प्रकल्पग्रस्तांसह कर्मचाऱ्यांना अडचणीची ठरणारी भूसंपादन विभागाची तीन कार्यालये लवकरच एकाच छताखाली येणार आहेत! होय, मावळते उप जिल्हाधिकारी ( भूसंपादन) भूषण अहिरे यांच्या अहिर्निश प्रयत्न व जिल्हाधिकारी एस. रामामूर्ती यांच्या पाठबळ, पाठपुरावा यामुळे जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात टोलेजंग व देखणी प्रशासकीय इमारत उभी राहणार असून, त्यात ही सर्व कार्यालये एकत्र थाटात नांदणार आहेत. यावर कळस म्हणजे यासाठी शासनाला कवडीही खर्च करण्याचे काम नसून, भूसंपादनाच्या स्वनिधीतून ही प्रशासकीय इमारत उभी राहणार आहे. अशा पद्धतीने निर्माण होणारी ही पश्चिम विदर्भतील पहिली इमारत ठरणार आहे.

नुकतेच सिंदखेड राजा येथे एसडीओ पदावर बदली झालेले मावळते उप जिल्हाधिकारी (भूसंपादन) यांनी आपल्या कार्यकाळात जिगाव व अन्य प्रकल्पांच्या भूसंपादन व मोबदला वाटपाची कामे मोठ्या संख्येने मार्गी लावली. यातील नुकसान भरपाई पोटी मिळणाऱ्या रकमेतून विभागास सोयी सुविधा शुल्क पोटी तीन टक्के रक्कम मिळते. यापोटी विभागाकडे तब्बल २० कोटी ४ लक्ष इतकी घसघशीत रक्कम जमा होती.

नुसत्याच पडून असलेल्या रकमेतून भूसंपादनच्या इमारत व दळणवळण, लसीका आणि मध्यम प्रकल्प या तीन कार्यालयासाठी टोलेजंग, देखणी आणि सर्व रेकॉर्ड जपू शकणारी सुसज्ज इमारत उभी राहू शकते, अशी संकल्पना श्री. अहिरे यांना सुचली. त्यांनी त्याचा प्राथमिक अभ्यास करत नियम, शासकीय निर्णय यांचा अभ्यास करून ही बाब जिल्हाधिकारी यांच्या समक्ष मांडली. त्यांनी याला तात्काळ हिरवी झेंडी दाखवत गो अहेड म्हटले. या दोन अभ्यासू अधिकाऱ्यांच्या पुढाकाराने सार्वजनिक बांधकाम बुलडाणाचे कार्यकारी अभियंता यांनी आराखडा तयार करून तांत्रिक मंजुरीसाठी अमरावती स्थित मुख्य अभियंता यांच्याकडे पाठविला. एस. रामामूर्ती यांनी संपूर्ण प्रस्ताव प्रसाशकीय मंजुरीसाठी विभागीय आयुक्त पियुष सिंह यांच्याकडे सादर केला. तसेच या जोडगोळीने त्याचा सतत पाठपुरावा केला.

१५ कोटींचा प्रस्ताव मंजूर
दरम्यान, त्यांचे भगीरथ प्रयत्न यशस्वी ठरले असून, आयुक्तांनी १५ कोटी ९२ लाख ३६ हजार रुपयांच्या प्रस्तावावर अंतिम शिक्कामोर्तब केले. आज संध्याकाळी आयुक्तांचे पत्र जिल्हाधिकारी कार्यालयास प्राप्त झाले. लवकरच जिल्हाधिकारी कार्यालयाचा निरोप घेऊन सिंदखेडराजा “एसडीओ’ पदाची सूत्रे स्वीकारण्याच्या तयारीत असलेले भूषण अहिरे यांच्यासाठी ही गुड न्यूज मोठा सेंड ऑफ ठरलाय!