सुखद वार्ता! जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली कोरोना लस!! साधेपणा तर पहा, एकटेच आले अन्‌ लस घेऊन गेले…

बुलडाणा (संजय मोहिते ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः राजेशाही कधीचीच संपली नव्हे इतिहासजमा झाली. पण लोकशाहीमध्ये जिल्हाधिकारी एखाद्या राजासारखाच असतो. अधिकारसंपन्न, राजा बोले दल हाले असा! बुलडाणेकरांनी तत्कालीन कलेक्टर सुमन चंद्रा यांच्या रुपात हा अनुभव घेतला. मात्र वर्तमान जि ल्हाधिकारी एस. रामामुर्ती हे किती साधे अन् जमिनीवर आहेत याचा प्रत्यय आज आला. सध्या जिल्ह्यातील फ्रंटलाईन …
 

बुलडाणा (संजय मोहिते ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः राजेशाही कधीचीच संपली नव्हे इतिहासजमा झाली. पण लोकशाहीमध्ये जिल्हाधिकारी एखाद्या राजासारखाच असतो. अधिकारसंपन्न, राजा बोले दल हाले असा! बुलडाणेकरांनी तत्कालीन कलेक्टर सुमन चंद्रा यांच्या रुपात हा अनुभव घेतला. मात्र वर्तमान जि ल्हाधिकारी एस. रामामुर्ती हे किती साधे अन्‌ जमिनीवर आहेत याचा प्रत्यय आज आला.

सध्या जिल्ह्यातील फ्रंटलाईन वर्कर अर्थात कोरोना योध्यांना कोविशिल्‍ड लस देण्याची मोहीम सुरू आहे. आरोग्य, महसूल, पोलीस विभागाचे अधिकारी व कर्मचारी, खासगी डॉक्टर्स, कर्मचाऱ्यांना लस देण्यात येत आहे. कालपरवा आरडीसी दिनेश गीते, एसडीओ राजेश्वर हांडे आदींनी लस घेतल्‍यानंतर आज, 20 फेब्रुवारीला जिल्हाधिकारी एस. रामामूर्ती यांचा नंबर होता. दुसरा कुणी असता तर अधिकारी, कर्मचाऱ्यांचा फौजफाटा घेऊन गेला असता. व्हीआयपी वागणुकीची अपेक्षा केली असती. मात्र हे काहीच न करता ते सकाळी 11ः30 वाजताच्या सुमारास सरळ जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल झाले. पूर्ण प्रक्रिया पूर्ण केल्यावर लस घेऊन व अर्धा तास सीएस डॉ. नितीन तडस यांच्या निरीक्षणात राहून ते आल्या पावली निघून गेले. त्यांच्या या साधेपणावर जिल्हा रुग्णालयात कौतुक वजा चर्चा रंगली. ही बातमी शहरात व्हायरल होताच शहर वासीयांत देखील ही चर्चा रंगत राहिली.