सुडाग्नी सुरूच!; विकृताने पेटवली महिमळ येथील सोयाबीनची सुडी

अमडापूर (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः सुडाग्नीने पेटलेल्या विकृतांचे कारनामे जिल्ह्यात सुरूच आहेत. अमडापूर (ता. चिखली) येथून जवळच असलेल्या महिमळ शिवारातील सोयाबीनची सुडी कुणीतरी पेटवून दिली. यात एक लाख रुपयांचे नुकसान झाले. 21 जानेवारीला ही घटना घडली.गेल्या काही दिवसांत अशा प्रकारच्या घटना वाढल्या असूनही, आरोपींना अटक करण्यात अद्याप पोलिसांना यश आलेले नाही. गेल्याच आठवड्यात टाकरखेड हेलगा …
 

अमडापूर (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः सुडाग्नीने पेटलेल्या विकृतांचे कारनामे जिल्ह्यात सुरूच आहेत. अमडापूर (ता. चिखली) येथून जवळच असलेल्या महिमळ शिवारातील सोयाबीनची सुडी कुणीतरी पेटवून दिली. यात एक लाख रुपयांचे नुकसान झाले. 21 जानेवारीला ही घटना घडली.
गेल्या काही दिवसांत अशा प्रकारच्या घटना वाढल्या असूनही, आरोपींना अटक करण्यात अद्याप पोलिसांना यश आलेले नाही. गेल्याच आठवड्यात टाकरखेड हेलगा येथेही तुरीची सुडी पेटवून देण्यात आली होती. अमडापूर पोलिसांनी अद्याप आरोपींचा छडा लावलेला नाही.
कचरू श्रीराम येवले यांची महिमळ शिवारात पाच एकर शेती आहे. त्यांनी शेतात सोंगणी करून ठेवलेल्या सोयाबीनच्या सुड्या लावल्या होत्या. या सुड्यांना कुणीतरी विकृताने आग लावून दिली. यात 20 क्विंटल सोयाबीन जळून खाक झाले. येवले येवले यांनी अमडापूर पोलिसांत फिर्याद दिली आहे. शासनाने नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकर्‍याने केली आहे.