सुलतानपूरच्‍या जवानाचा जोधपूरमध्ये मृत्‍यू; दोन महिन्यांपूर्वीच झाला होता विवाह

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः सुलतानपूर (ता. लोणार) येथील जवानाचा सैन्यात कर्तव्यावर असताना जोधपूर येथे आकस्मिक मृत्यू झाला. ही घटना काल, 2 मे रोजी रात्री घडली. पवन विष्णू रिंढे (25) असे जवानाचे नाव आहे. दोन महिन्यांपूर्वीच पवन यांचा विवाह झाला होता. महिनाभरापूर्वी ते जोधपूर येथे गेले होते. एकुलत्या एक असलेल्या पवन यांच्या निधनाचे वृत्त कळताच …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः सुलतानपूर (ता. लोणार) येथील जवानाचा सैन्यात कर्तव्यावर असताना जोधपूर येथे आकस्मिक मृत्यू झाला. ही घटना काल, 2 मे रोजी रात्री घडली. पवन विष्णू रिंढे (25) असे जवानाचे नाव आहे.

दोन महिन्यांपूर्वीच पवन यांचा विवाह झाला होता. महिनाभरापूर्वी ते जोधपूर येथे गेले होते. एकुलत्या एक असलेल्या पवन यांच्या निधनाचे वृत्त कळताच सुलतानपूरवर शोककळा पसरली. त्यांचा मृतदेह आज, 4 मेच्‍या संध्याकाळपर्यंत सुलतानपूरला आणण्यात येणार आहे. तिथे त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाने दिली आहे.