‘सृष्टी’ नारीरत्‍नांना करणार पुरस्‍काराने सन्‍मानित

शेगाव (ज्ञानेश्वर ताकोते ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून सृष्टी सेवाभावी संस्थेतर्फे विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांना नारीरत्न पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे, अशी माहिती संस्थेच्या अध्यक्षा तथा नगर परिषद स्थायी समिती सदस्या प्रितीताई शेगोकार यांनी दिली. उद्या 8 मार्च रोजी सकाळी 11 वाजता माऊली टाॅवर, माऊली हाॅस्पिटलवर, जगदंबा …
 

शेगाव (ज्ञानेश्वर ताकोते ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून सृष्टी सेवाभावी संस्थेतर्फे विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांना नारीरत्न पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे, अशी माहिती संस्थेच्या अध्यक्षा तथा नगर परिषद स्थायी समिती सदस्या प्रितीताई शेगोकार यांनी दिली.

उद्या 8 मार्च रोजी सकाळी 11 वाजता माऊली टाॅवर, माऊली हाॅस्पिटलवर, जगदंबा चौक, शेगाव येथे मान्यवरांचे हस्ते पुरस्काराचे वितरण होणार आहे. माऊली ग्रुपचे सर्वेसर्वा ज्ञानेश्वरदादा पाटील, सातपुडा शिक्षण संस्थेच्या संचालिका डाॅ स्वातीताई वाकेकर, श्री ग. म. मतिमंद विद्यालयाचे अध्यक्ष ह भ प गजानन महाराज वाघ यांच्‍या हस्ते पुरस्काराचे वितरण होईल.

या महिलांचा होणार सन्मान…
शेगाव पं. स. सभापती सौ. शारदाताई लांजुडकर, उपसभापती सौ. शालिनीताई सोनोने, इंदिरा गांधी पतसंस्थेच्या संस्थापिका सौ. माधुरीताई देशमुख, बुरूंगले शिक्षण संस्थेच्या प्राचार्य सौ. मीनाक्षीताई बुरूंगले, बुलडाणा जिल्हा बचत गट फेडरेशनच्या अध्यक्षा सौ. जयश्रीताई शेळके, एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकारी सौ. वैशाली घनोकार, स्‍त्री रोग त तज्‍ज्ञ डाॅ. सबा हुसेन, सईबाई मोटे उपजिल्हा सामान्य रुग्णालयाच्या डाॅ. प्राची जाधव, आरोग्य उपकेंद्राच्या डाॅ. मोनिका थोरात, गुणवंत शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा अरूंधती सिरसाट अकोला, माविमच्या व्यवस्थापिका योगिता खोंड, सौ. अंजलीताई देशपांडे, श्री गुरूदेव शिवण कला केंद्राच्या संचालिका सौ देवका उंबरकार.