सॅनिटरी पॅड किती वेळा बदलावा? तज्‍ज्ञ काय म्हणतात?

नवी दिल्ली ः महिलांना मासिक पाळी येणं ही सर्वसाधारण बाब आहे. या काळात आरोग्याची काळजी घ्यावी लागते. मासिक पाळी दरम्यान स्वच्छतेकडे अधिक लक्ष देण्याची गरज आहे. मासिक पाळीच्या काळात सॅनिटरी नॅपकीन किती वेळा, किती तासांनी बदलायचा, याबाबत महिलांच्या मनात काही शंका असतात. त्यावर तज्ज्ञ काय म्हणतात, हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे… तज्ज्ञांच्या म्हणण्याप्रमाणे, एकाच पॅडचा …
 

नवी दिल्ली ः महिलांना मासिक पाळी येणं ही सर्वसाधारण बाब आहे. या काळात आरोग्याची काळजी घ्यावी लागते. मासिक पाळी दरम्यान स्वच्छतेकडे अधिक लक्ष देण्याची गरज आहे. मासिक पाळीच्या काळात सॅनिटरी नॅपकीन किती वेळा, किती तासांनी बदलायचा, याबाबत महिलांच्या मनात काही शंका असतात. त्यावर तज्‍ज्ञ काय म्हणतात, हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे…

तज्‍ज्ञांच्या म्हणण्याप्रमाणे, एकाच पॅडचा बराच काळ वापर करणे आरोग्याच्या दृष्टीने धोकादायक असते. योनी मार्ग आणि सभोवतालच्या त्वचेला संसर्ग होऊ शकतो. त्यामुळे महिलांनी मासिक पाळीच्या दरम्यान वारंवार पॅड बदललं पाहिजेत. मासिक पाळीच्या काळात दिवसातून किती वेळा पॅड बदललं पाहिजे, या प्रश्नाचं कोणतंही निश्चित असं उत्तर नाही. सॅनिटरी नॅपकिन बदलणं हे मासिक पाळीच्या काळात होणाऱ्या रक्ताच्या प्रवाहावर अवलंबून असतं. पहिले दोन- तीन दिवस रक्तस्त्राव जास्त असतो. त्यामुळं पॅड कधी बदलावं हे व्यक्तीगणीक बदलतं. अमेरिकन काॅलेज आॅफ ऑॅबस्चट्रेशिअन्स अँड गायनाॅकाॅलिजच्या मतेख मासिक पाळी दरम्यान सामान्य रक्तस्त्राव होत असल्यास स्त्रियांनी चार ते आठ तासांनंतर पॅड बदललं पाहिजे.