सेल्समन ते बेकरी मालक : यादवांची ‘विजयी’ वाटचाल!

बेकरीच्या विविध उत्पादनांचे मार्केटिंग करतानाही त्या महत्त्वाकांक्षी युवकाला आत्मनिर्भर अर्थात इतरांना नोकरी देणारा व्यावसायिक, बेकरी मालक बनण्याची स्वप्ने तरळत होती. केवळ स्वप्नच नव्हे तर त्याचा निर्धार पक्का होत होता. एका सुवर्ण क्षणी त्याचे स्वप्न खरोखरच पूर्ण झाले अन् तो दर्जेदार उत्पादन करणारा यशस्वी बेकरी मालक झाला…! विजय डिगांबर यादव असे या यशस्वी व्यावसायिकाचे नाव असून …
 
सेल्समन ते बेकरी मालक : यादवांची ‘विजयी’ वाटचाल!

बेकरीच्या विविध उत्पादनांचे मार्केटिंग करतानाही त्या महत्त्वाकांक्षी युवकाला आत्मनिर्भर अर्थात इतरांना नोकरी देणारा व्यावसायिक, बेकरी मालक बनण्याची स्वप्ने तरळत होती. केवळ स्वप्नच नव्हे तर त्याचा निर्धार पक्का होत होता. एका सुवर्ण क्षणी त्याचे स्वप्न खरोखरच पूर्ण झाले अन् तो दर्जेदार उत्पादन करणारा यशस्वी बेकरी मालक झाला…!

सेल्समन ते बेकरी मालक : यादवांची ‘विजयी’ वाटचाल!

विजय डिगांबर यादव असे या यशस्वी व्यावसायिकाचे नाव असून त्यांची ही यशोगाथा एखाद्या कादंबरीमधील कथा वाटावी अशीच आहे. गत 15 वर्षांपासून या व्यवसायात कार्यरत असलेल्या श्री. यादव यांनी आपल्या स्वप्नपूर्तीनंतर मात्र कधीच मागे वळून पाहिले नाही!! आज शेगावमधील मुख्य प्रतिष्ठान अर्थात मेन ब्रँच शेगाव येथे शेगाव- संग्रामपूर रोडवर आहे. याशिवाय शेगावातील प्रसिद्ध भगवान अग्रसेन चौक व संग्रामपूर रोड वरवट बकाल येथे शाखा उत्तम व्यवसाय करत आहेत. या ठिकाणी सर्व बेकरी प्रॉडक्ट्स उपलब्ध आहेत. यामध्ये ब्रेड, टोस्ट, खारी, काजू टोस्ट, कुकीज, पेस्ट्री, पिझ्झा असे पाहता क्षणी तोंडाला पाणी सुटणारे चविष्ट पदार्थ उपलब्ध आहेत. याशिवाय साऊथ इंडियन सुद्धा दिमतीला आहे हे विशेष. मात्र हे यश मिळविण्यासाठी यादव यांनी कठोर परिश्रम घेतले, अनेक अडचणींचा सामना केला, त्यावर मात करून ते आजच्या पोझिशनवर पोहोचले. यासाठी आई-वडिल, काका सुरेश यादव यांची प्रेरणा, आशीर्वाद मिळाले.

सेल्समन ते बेकरी मालक : यादवांची ‘विजयी’ वाटचाल!

भारत राठी यांनी दिलदारपणे मदत, मार्गदर्शन केलं, असे त्यांनी बुलडाणा लाईव्हशी बोलताना सांगितले. यामुळे व हजारो ग्राहकांच्या सहकार्यामुळेच आजवरची मजल मारू शकलो, असेही त्यांनी विनम्रपणे सांगितले. कोरोना व लॉकडाऊनमध्ये पुरेपूर दक्षता घेऊन ग्राहकांचे आरोग्य जपत व्यवसाय केला. नो मास्क नो एन्ट्री हे तत्त्व पाळले. सॅनिटायझरचा वापर केला. सर्व प्रॉडक्ट्स कोरोना विषयक नियम, निर्देश पाळूनच केले याचा त्यांनी या चर्चेत आवर्जून उल्लेख केला. यामुळे हजारो ग्राहकांचा विश्‍वास आणखीनच दृढ झाला, हा विश्‍वास लाखमोलाचा व सतत प्रेरणा, ऊर्जा देणारा ठरतोय, असे सांगून त्यांनी या चर्चेला विराम दिला.

सेल्समन ते बेकरी मालक : यादवांची ‘विजयी’ वाटचाल!