सैलानी येथील सर्व दुकाने ३ दिवस बंद; मोठ्या अमावस्येला गर्दी जमू नये म्हणून जिल्हा प्रशासनाचा निर्णय

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः पिंपळगाव सराई (सैलानी) येथे पोळा व मोठ्या अमावस्येनिमित्त भाविक मोठ्या प्रमाणात गर्दी करत असतात. कोरोना संसर्ग होऊ नये म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी सैलानी येथील सर्वच दुकाने ५ सप्टेंबर ते ७ सप्टेंबर या कालावधीत बंद ठेवण्याचे आदेश आज, २ सप्टेंबर रोजी दिले आहेत. मोठी अमावस्या व पोळा सणानिमित्त दरवर्षी विविध राज्यांतील १ ते …
 
सैलानी येथील सर्व दुकाने ३ दिवस बंद; मोठ्या अमावस्येला गर्दी जमू नये म्हणून जिल्हा प्रशासनाचा निर्णय

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः पिंपळगाव सराई (सैलानी) येथे पोळा व मोठ्या अमावस्येनिमित्त भाविक मोठ्या प्रमाणात गर्दी करत असतात. कोरोना संसर्ग होऊ नये म्‍हणून जिल्हाधिकाऱ्यांनी सैलानी येथील सर्वच दुकाने ५ सप्टेंबर ते ७ सप्टेंबर या कालावधीत बंद ठेवण्याचे आदेश आज, २ सप्टेंबर रोजी दिले आहेत.

मोठी अमावस्या व पोळा सणानिमित्त दरवर्षी विविध राज्यांतील १ ते दीड लाख भाविक सैलानी बाबा दर्गा येथे दर्शनासाठी येत असतात. कोरोनाची तिसरी लाट येण्याची श्यक्यता वर्तविण्यात येत असल्याने जिल्हा प्रशासनाने यावर्षी सैलानी येथे गर्दी न करण्याचे आवाहन केले आहे. सर्व प्रकारची फुले, प्रसादांची दुकाने व सर्वच आस्थापना ५ ते ७ सप्टेंबर रोजी बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.