सोबत पळून चल, नाही तर बदनामी करेन… 17 वर्षीय मुलीला धमकी..!; खामगावातील घटना

खामगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः तू सोबत पळून चल, नाहीतर बदनामी करेन, अशी धमकी देत 17 वर्षीय मुलीचा विनयभंग करण्यात आल्याची घटना खामगाव शहरातील सजनपुरी भागात समोर आली आहे. या प्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी गणेश तुळशीराम सावरकर या तरुणाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. गणेश सतत तिचा पाठलाग करायचा. काल त्याने तिला अडवून धमकी दिली. मुलीने भावाला …
 

खामगाव (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः तू सोबत पळून चल, नाहीतर बदनामी करेन, अशी धमकी देत 17 वर्षीय मुलीचा विनयभंग करण्यात आल्याची घटना खामगाव शहरातील सजनपुरी भागात समोर आली आहे. या प्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी गणेश तुळशीराम सावरकर या तरुणाविरोधात गुन्‍हा दाखल केला आहे.

गणेश सतत तिचा पाठलाग करायचा. काल त्‍याने तिला अडवून धमकी दिली. मुलीने भावाला ही घटना सांगितली असता भावाने त्‍याला जाब विचारला त्‍याने त्‍यालाही शिविगाळ केली. मुलीने शिवाजीनगर पोलीस ठाणे गाठून गणेशविरुद्ध तक्रार नोंदवली. त्‍यावरून पोलिसांनी पोस्को कायद्यासह विनयभंगाचा गुन्‍हा नोंद केला आहे.