सोयाबीन उत्पादकांसाठी महत्त्वाची बातमी… २४ तारखेनंतर वरुण राजा पुन्हा जोरात बरसणार, कामे लवकर उरका!

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जिल्ह्यात यावर्षी सर्वाधिक पेरा सोयाबीन पिकाचा झाला आहे. यावर्षी सोयाबीनला चांगला भाव मिळण्याची शक्यता असताना शेतकऱ्यांची चिंता वाढवणारी बातमी हवामान विभागाने दिली आहे. जिल्ह्यात १७, १८, १९ सप्टेंबर रोजी तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस होईल. २० आणि २१ सप्टेंबर रोजी जिल्ह्यात सार्वत्रिक पाऊस होईल. २४ सप्टेंबर ते ३० …
 
सोयाबीन उत्पादकांसाठी महत्त्वाची बातमी… २४ तारखेनंतर वरुण राजा पुन्हा जोरात बरसणार, कामे लवकर उरका!

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जिल्ह्यात यावर्षी सर्वाधिक पेरा सोयाबीन पिकाचा झाला आहे. यावर्षी सोयाबीनला चांगला भाव मिळण्याची शक्यता असताना शेतकऱ्यांची चिंता वाढवणारी बातमी हवामान विभागाने दिली आहे.

जिल्ह्यात १७, १८, १९ सप्टेंबर रोजी तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस होईल. २० आणि २१ सप्टेंबर रोजी जिल्ह्यात सार्वत्रिक पाऊस होईल. २४ सप्टेंबर ते ३० सप्टेंबर या कालावधीत सरासरीपेक्षा जास्त पाऊस होण्याची शक्यता आहे. ज्या शेतकऱ्यांनी १५ जूनपूर्वी पेरणी केली आहे आणि शेंगाचा रंग बदलून परिपक्व झाल्या असतील, त्या शेतकऱ्यांनी पिकाची कापणी करून सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवावे, असे आवाहन कृषी हवामान केंद्र बुलडाणाचे मनिष येदुलवार यांनी केले आहे.