सोयाबीन सोंगणीला जाणाऱ्या मजुरांचे वाहन उलटले; ३५ जण जखमी, मोताळा तालुक्‍यातील दुर्घटना

मोताळा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः सोयाबीन सोंगणीसाठी भादोला (ता. बुलडाणा) येथे मजूर घेऊन जात असलेले टाटा ४०७ वाहन उलटले. या अपघातात ३५ जण जखमी झाल्याची घटना आज, ५ ऑक्टोबर रोजी तरोडा गावाजवळ सकाळी ११ च्या सुमारास घडली. सध्या सोयाबीन सोंगण्याचा हंगाम आहे. मजुरांची संख्या कमी असल्याने अनेक गावांमध्ये बाहेरगावावरून मजूर बोलावण्यात येते. तरोडा येथील मजूर …
 
सोयाबीन सोंगणीला जाणाऱ्या मजुरांचे वाहन उलटले; ३५ जण जखमी, मोताळा तालुक्‍यातील दुर्घटना

मोताळा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः सोयाबीन सोंगणीसाठी भादोला (ता. बुलडाणा) येथे मजूर घेऊन जात असलेले टाटा ४०७ वाहन उलटले. या अपघातात ३५ जण जखमी झाल्याची घटना आज, ५ ऑक्टोबर रोजी तरोडा गावाजवळ सकाळी ११ च्‍या सुमारास घडली.

सध्या सोयाबीन सोंगण्याचा हंगाम आहे. मजुरांची संख्या कमी असल्याने अनेक गावांमध्ये बाहेरगावावरून मजूर बोलावण्यात येते. तरोडा येथील मजूर भादोला येथे सोयाबीन सोंगण्यासाठी येत असताना गावाजवळच त्यांचे वाहन उलटले. यात ३५ जण जखमी झाले. काही जखमींना जिल्हा रुग्णालयात तर काहींना बुलडाणा शहरातील विविध खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. जखमींपैकी ४ ते ५ जणांची प्रकृती गंभीर आहे. घटनेची माहिती मिळताच आमदार संजय गायकवाड यांनी रुग्णालयात जाऊन जखमींच्या प्रकृतीची चौकशी केली. बुलडाणा ग्रामीण पोलीस पुढील तपास करीत आहेत.