सोळंके-घायल समर्थक भिडले, तलवार चालली, 1 गंभीर, संग्रामपूर तालुक्‍यातील थरार

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः गाडीला कट मारण्याच्या कारणावरून वरवट बकाल फाट्यावर अर्जुन सोळंके आणि राजेश्वर घायल यांच्यासह त्यांच्या समर्थकांत धुमश्चक्री झाली. तुंबळ हाणामारीत तलवार चालली. यात एक जण गंभीर जखमी झाला असून, त्याला उपचारासाठी अकोल्याला हलवावे लागले आहे. काल, 24 मार्चच्या सायंकाळी ही घटना घडली. या प्रकरणात अर्जुन देवराव सोळंके (रा. वरवट बकाल, ता. …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः गाडीला कट मारण्याच्‍या कारणावरून वरवट बकाल फाट्यावर अर्जुन सोळंके आणि राजेश्वर घायल यांच्‍यासह त्‍यांच्‍या समर्थकांत धुमश्चक्री झाली. तुंबळ हाणामारीत तलवार चालली. यात एक जण गंभीर जखमी झाला असून, त्‍याला उपचारासाठी अकोल्याला हलवावे लागले आहे. काल, 24 मार्चच्‍या सायंकाळी ही घटना घडली.

या प्रकरणात अर्जुन देवराव सोळंके (रा. वरवट बकाल, ता. संग्रामपूर) व राजेश्वर रामकृष्ण घायल  (रा. बावनबीर, ता. संग्रामपूर) यांनी परस्परविरोधी तक्रारी तामगाव पोलीस ठाण्यात दिल्या आहेत. दोघांचा गाडीला कट मारण्याच्या कारणावरून बावनबीर येथील कैची फाट्यावर वाद झाला होता. त्यानंतर दोघेही वरवट फाट्यावर आले. तिथे दोघांचे समर्थक आधीच हजर होते. दोघांमध्ये पुन्हा वाद होऊन तुंबळ हाणामारी सुरू झाली. यात सुरज राजेश घायल (20, रा. बावनबीर, ता. संग्रामपूर) हा तरुण गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी अकोला येथे हलविण्यात आले आहे. याप्रकरणी दोन्ही गटांतील 8 जणाविरोधात तामगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, गुन्ह्यात वापरलेली तलवार जप्त करण्यात आली आहे.