स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांची पूर्वतयारी जोमात! हजारो कंट्रोल युनिटची उद्यापासून होणार दुरुस्ती; ७ तज्‍ज्ञ बुलडाण्यात दाखल!!

बुलडाणा (विशेष प्रतिनिधी ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः ओबीसी आरक्षणाचा मुद्दा मोठी अडचण असली तरी राज्य निवडणूक आयोगाने स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांची जय्यत तयारी चालविली आहे. याचाच एक भाग म्हणून मतदान यंत्रातील कंट्रोल युनिटची दुरुस्ती करण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. उद्या, 7 सप्टेंबरपासून ही दुरुस्ती करण्यात येणार असून, त्यासाठी बंगळुरू येथील इलेक्ट्रॉनिकस कॉर्पोरेशन ऑफ …
 
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांची पूर्वतयारी जोमात! हजारो कंट्रोल युनिटची उद्यापासून होणार दुरुस्ती; ७ तज्‍ज्ञ बुलडाण्यात दाखल!!

बुलडाणा (विशेष प्रतिनिधी ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः ओबीसी आरक्षणाचा मुद्दा मोठी अडचण असली तरी राज्य निवडणूक आयोगाने स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांची जय्यत तयारी चालविली आहे. याचाच एक भाग म्हणून मतदान यंत्रातील कंट्रोल युनिटची दुरुस्ती करण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. उद्या, 7 सप्टेंबरपासून ही दुरुस्ती करण्यात येणार असून, त्यासाठी बंगळुरू येथील इलेक्ट्रॉनिकस कॉर्पोरेशन ऑफ इंडियाचे ७ तज्‍ज्ञ अभियंता बुलडाण्यात दाखल झाले आहेत.

येत्या नोव्हेंबरमध्ये जिल्ह्यातील 9 नागरपरिषदांची मुदत संपत आहे. यात लोणार व सिंदखेड राजा वगळता अन्य पालिकांचा समावेश आहे. याशिवाय संग्रामपूर व मोताळा नागरपंचायतींची मुदत मागील डिसेंबर 2020 मध्येच संपली असल्याने तिथे प्रशासक नेमण्यात आले आहेत. या पाठोपाठ फेब्रुवारी २०२२ मध्ये बुलडाणा जिल्हा परिषद व १३ पंचायत समित्यांची मुदत संपणार आहे. यामुळे आयोगाने या लढतीची पूर्वतयारी चालविली आहे. नगरपालिकेला कच्चे प्रभाग रचना आराखडे तयार करण्याचे आदेश देण्यात आले असून त्याचे काम सुरू आहे.

यापुढील टप्प्यात जिल्ह्यात उपलब्ध इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांच्या नादुरुस्त कंट्रोल युनिटची दुरुस्ती करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. उद्यावारपासून बुलडाणा येथील अल्पबचत भवनात २२८० कंट्रोल युनिटच्या दुरुस्तीस प्रारंभ होणार आहे. जिल्हाधिकारी एस. रामामूर्ती, उपजिल्हाधिकारी ( निवडणूक) गौरी सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली होणाऱ्या या मोहिमेसाठी बंगळुरू येथील इलेक्ट्रॉनिकस कॉर्पोरेशन ऑफ इंडियाचे ७ अभियंता बुलडाण्यात डेरेदाखल झाले आहेत. यासाठी १५ कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. यात निवडणूक विभागाचे नायब तहसीलदार सुनील आहेर, अव्वल कारकून राम जाधव महत्त्वाची भूमिका पार पाडणार आहेत.