स्‍कूटी ट्रकला धडकली, मायलेकी गंभीर; ट्रक उलटला!, मलगी फाट्यावरील घटना

चिखली (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः स्कूटी ट्रकला धडकली. स्कुटीला वाचवण्याच्या प्रयत्नात ट्रकही उलटला. यात स्कुटीस्वार मायलेकी गंभीर जखमी झाल्या तर ट्रकचालक किरकोळ जखमी झाला. ही घटना चिखली- देऊळगाव राजा रोडवरील मलगी फाट्यावर काल, १३ जुलैला सायंकाळी पाचच्या सुमारास घडली. छाया किशोर गाताडे (४०)आणि किरण किशोर गाताडे (२०, रा. पिंपळवाडी, ता. चिखली) अशी गंभीर जखमी मायलेकींची …
 

चिखली (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः स्‍कूटी ट्रकला धडकली. स्कुटीला वाचवण्याच्या प्रयत्नात ट्रकही उलटला. यात स्कुटीस्वार मायलेकी गंभीर जखमी झाल्या तर ट्रकचालक किरकोळ जखमी झाला. ही घटना चिखली- देऊळगाव राजा रोडवरील मलगी फाट्यावर काल, १३ जुलैला सायंकाळी पाचच्या सुमारास घडली.

छाया किशोर गाताडे (४०)आणि किरण किशोर गाताडे (२०, रा. पिंपळवाडी, ता. चिखली) अशी गंभीर जखमी मायलेकींची नावे आहेत. दोघी पिंपळवाडीवरून चिखलीकडे जात होत्या. चिखली- देऊळगाव राजा रोडवर गतिरोधक नसल्याने मलगी फाट्यावरील वळणावर वाहन दिसत नाही. वेगाचा अंदाज न आल्याने औरंगाबादकडे जाणाऱ्या ट्रकला (क्र. एमएच १७ बीवाय ४४९१) स्‍कूटी (क्र. एमएच २७ बीएफ २७४४) धडकली. यात दोन्ही मायलेकी गंभीर जखमी झाल्या. स्कुटीला वाचवण्याच्या प्रयत्नात ट्रकदेखील उलटला. यात ट्रकचालक देखील जखमी झाला.