स्‍कोडा कार घेऊन जुगार खेळायला आला… पोलिसांनी अड्ड्यावर छापा मारून 7 जणांना पकडले; साडेसात लाख रुपयांचा मुद्देमाल जप्‍त; बुलडाणा तालुक्‍यातील कारवाई

बुलडाणा (अजय राजगुरे ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः बुलडाणा ग्रामीण पोलिसांनी वरवंड (ता. बुलडाणा) शिवारातील शेतात जुगार अड्ड्यावर छापा मारून 7 जणांना ताब्यात घेतले. ही कारवाई आज, 26 मे रोजी दुपारी साडेचारच्या सुमारास करण्यात आली. आरोपींकडून तब्बल साडेसात लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. रंगनाथ गोपाळा काकडे (48, रा. भादोला वाडी), शिवाजी कुंडलिक चव्हाण …
 

बुलडाणा (अजय राजगुरे ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः बुलडाणा ग्रामीण पोलिसांनी वरवंड (ता. बुलडाणा) शिवारातील शेतात जुगार अड्ड्यावर छापा मारून 7 जणांना ताब्‍यात घेतले. ही कारवाई आज, 26 मे रोजी दुपारी साडेचारच्‍या सुमारास करण्यात आली. आरोपींकडून तब्‍बल साडेसात लाख रुपयांचा मुद्देमाल जप्‍त करण्यात आला आहे.

रंगनाथ गोपाळा काकडे (48, रा. भादोला वाडी), शिवाजी कुंडलिक चव्‍हाण (34, रा. वरवंड), करीम शाह मुसा शाह (53, रा. वरवंड), संजय मारोती खारे (36, रा. वरवंड), विठ्ठल हिंमतराव जेऊघाले (46, रा. वरवंड), अरुण सुधाकर शेळके (35, रा. वरवंड), गजानन प्रल्हाद भालेराव (46, रा. सुंदरखेड, जि. बुलडाणा) अशी पकडण्यात आलेल्या जुगाऱ्यांची नावे आहेत. त्‍यांच्‍याकडून 1 स्‍कोडा कंपनीची कार, 4 मोटारसायकली (एकूण किंमत 6 लाख 65 हजार), पाच मोबाइल (किंमत 72 हजार रुपये) असा एकूण 7 लाख 63 हजार 40 रुपयांचा मुद्देमाल जप्‍त करण्यात आला. ही कारवाई पोलीस निरिक्षक सारंग नवलकर, सहायक पोलीस उपनिरिक्षक मोहन राठोड, पोहेकाँ गणेश शेळके, पो.ना. श्री. बोरसे, पोकाँ दुर्गासिंग ठाकूर, पोकाँ दीपक डोळे, चालक पो.ना. संजय ठोंबरे यांनी केली. शासकीय जीपने पेट्रोलिंग करताना त्‍यांना या जुगार अड्ड्याची गोपनीय माहिती मिळाली होती. पुरेशी खबरदारी घेऊन अचानक पोलिसांनी जुगाऱ्यांवर हल्लाबोल केला. त्‍यामुळे जुगाऱ्यांचा पळून जाण्याचा प्रयत्‍नही फसला.