‘हनी ट्रॅप’ची आरोपी महिला घरातून बेपत्ता; अंचरवाडीतील घटना

बुलडाणा (विशेष प्रतिनिधी ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा)ः रागाच्या भरात कुणाला काहीही न सांगता 26 वर्षीय विवाहिता घरातून निघून गेली. ही घटना काल, 17 मार्च रोजी दुपारी 12:30 च्या सुमारास अंचरवाडी (ता. चिखली) येथे घडली. याप्रकरणी विवाहितेच्या पतीने अंढेरा पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. अश्विनी नितीन खिल्लारे (26, रा. अंचरवाडी) असे बेपत्ता विवाहितेचे नाव आहे. काल …
 

बुलडाणा (विशेष प्रतिनिधी ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा)ः रागाच्या भरात कुणाला काहीही न सांगता 26 वर्षीय विवाहिता घरातून निघून गेली. ही घटना काल, 17 मार्च रोजी दुपारी 12:30 च्या सुमारास अंचरवाडी (ता. चिखली) येथे घडली. याप्रकरणी विवाहितेच्या पतीने अंढेरा पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

अश्विनी नितीन खिल्लारे (26, रा. अंचरवाडी) असे बेपत्ता विवाहितेचे नाव आहे. काल दुपारी साडेबाराच्या सुमारास घरातील किरकोळ कारणावरून रागाच्या भरात ती निघून गेली. कालपासून नातेवाईक व इतर सर्वत्र शोध घेतला असता ती मिळून आली नाही. आज विविहितेच्या पतीने अंढेरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.  गोरा रंग, मजबूत बांधा, 5 फूट उंची, पायात स्लिपर, अंगात भुरकट रंगाची साडी, काळे ब्लाउज अशा वर्णनाची महिला आढळल्यास संपर्क साधण्याचे आवाहन अंढेरा पोलिसांनी केले आहे.

बेपत्ता महिला हनी ट्रॅप प्रकरणातील आरोपी

बेपत्ता विवाहिता एका हनी ट्रॅप प्रकरणात आरोपी होती. कॉल रेकॉर्डिंग व्हायरल करू नये म्हणून तिने देऊळगाव मही येथील एका शेतकऱ्याला दोन लाख रुपयांची मागणी केली होती. त्यातील पहिला हप्ता घेताना तिला एलसीबीने रंगेहात पकडले होते.