हरभरा खरेदी सुरळीत सुरू; १८ जूनपर्यंत नोंदणी, २५ जूनपर्यंत खरेदी सुरू राहणार

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः “नाफेड’तर्फे हमीदराने हरभरा खरेदी करण्यात येत आहे. हरभरा खरेदीसाठी शेतकऱ्यांची १५ फेब्रुवारी ते १७ मेदरम्यान नोंदणी करण्यात आली होती. त्यानंतर लॉकडाऊन लागल्यामुळे शेतकऱ्यांची नोंदणी होऊ न शकली नाही. शासनाने ८ जून ते १८ जूनपर्यंत पुन्हा एकदा शेतकऱ्यांची हरभरा विक्री करण्यासाठी नोंदणी करण्यात मुदतवाढ दिली आहे. त्यानुसार नोंदणीचे कामकाज सुरू असून, …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः “नाफेड’तर्फे हमीदराने हरभरा खरेदी करण्यात येत आहे. हरभरा खरेदीसाठी शेतकऱ्यांची १५ फेब्रुवारी ते १७ मेदरम्‍यान नोंदणी करण्यात आली होती. त्यानंतर लॉकडाऊन लागल्यामुळे शेतकऱ्यांची नोंदणी होऊ न शकली नाही. शासनाने ८ जून ते १८ जूनपर्यंत पुन्हा एकदा शेतकऱ्यांची हरभरा विक्री करण्यासाठी नोंदणी करण्यात मुदतवाढ दिली आहे. त्यानुसार नोंदणीचे कामकाज सुरू असून, खरेदीही सुरळीत सुरू आहे.

ज्या शेतकऱ्यांनी नोंदणी केलेली होती. अशा सर्व १७ हजार ४२१ शेतकऱ्यांना खरेदीसाठी एसएमएस देण्यात आलेले आहेत. मात्र बाजारपेठेतील दर जास्त असल्यामुळे २५ मेपर्यंत हमी दराने ७८ हजार ७१४ क्विंटल हरभरा शेतमालाची ४ हजार ४९९ शेतकऱ्यांकडून खरेदी करण्यात आली होती. नंतर शासनाने २५ जूनपर्यंत शेतकऱ्यांची खरेदी करण्यासाठी मुदतवाढ दिल्याने परत खरेदीस सुरुवात करण्यात आली आहे. मात्र मध्यंतरीच्या काळात हमीदरापेक्षा जास्त दर मार्केटमध्ये असल्याने महिनाभर शेतकरी हमी दराचे केंद्रावर माल विक्रीसाठी आले नाही.

सद्यःस्थितीत बाजारपेठेतील दर कमी झाल्याने शेतकऱ्यांनी परत हमी दर केंद्राकडे विक्रीसाठी माल आणावयास सुरुवात केली आहे. त्यासाठी आवश्यक असणारा बारदानासुद्धा केंद्रावर पुरवठा करण्यात आलेला असून, खरेदी केंद्र सुरळीत सुरू झाले आहेत. लॉकडाऊनमुळे बारदाना मिळण्यास थोडा उशिर होत आहे. मात्र जस जसा बारदाना प्राप्त होईल. त्याप्रमाणे खरेदी केंद्र २५ जूनपर्यंत सुरूच राहणार आहेत. शेतकऱ्यांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा पणन अधिकारी पी. एस शिंगणे यांनी केले आहे.