हवामान तज्‍ज्ञ पंजाब डख यांच्‍याकडे शेतकऱ्यांचे ५६० ग्रुप्स!

मेहकर (अनिल मंजुळकर ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः शेतकऱ्यांना शेतीविषयक माहिती पुरविणे हा माझा छंद असून मी शेतकऱ्यांचे ५६० ग्रुप तयार करून तीन कोटी शेतकऱ्यांना हवामानाबद्दल माहिती देता, असे प्रतिपादन हवामान तज्ज्ञ पंजाब डख यांनी देऊळगाव साकर्शा येथे सत्कार सोहळ्यात केले. सरपंच संदीप अल्हाट, रतन दुगड, सुधाकर गायकवाड व अन्य प्रतिष्ठितांनी श्री. डख यांचा सत्कार …
 
हवामान तज्‍ज्ञ पंजाब डख यांच्‍याकडे शेतकऱ्यांचे ५६० ग्रुप्स!

मेहकर (अनिल मंजुळकर ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः शेतकऱ्यांना शेतीविषयक माहिती पुरविणे हा माझा छंद असून मी शेतकऱ्यांचे ५६० ग्रुप तयार करून तीन कोटी शेतकऱ्यांना हवामानाबद्दल माहिती देता, असे प्रतिपादन हवामान तज्‍ज्ञ पंजाब डख यांनी देऊळगाव साकर्शा येथे सत्कार सोहळ्यात केले.

सरपंच संदीप अल्हाट, रतन दुगड, सुधाकर गायकवाड व अन्य प्रतिष्ठितांनी श्री. डख यांचा सत्कार केला. त्यांच्यासोबत अमोल नायकल, रामभाऊ डख, लक्ष्मण नायकल, कृष्णा मोरे, वेदांत डख यांचाही सत्कार करण्यात आला. पोलीस पाटील गजानन पाचपोर, पत्रकार संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रमोद देशमुख, तंटामुक्ती अध्यक्ष रामदास बोरचाटे, दिलीप नवत्रे, जीवन देशमुख, बाळू वानखेडे, रितेश दुगड, बुलडाणा अर्बनचे व्यवस्थापक श्री. बऱ्हाटे आदी हजर होते. हा कार्यक्रम कास्तकार सुधाकर गायकवाड यांनी घेतला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. मुंडे यांनी केले. आभार श्री. चवरे यांनी मानले.