हाजी रशीदखॉ जमदार यांची पाठराखण!; राहुल बोंद्रे भेटले एसपींना!!

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः आपल्या वाढदिवसाच्या पार्टीत तलवारी घेऊन नाचणार्यांसोबत स्वतःही तलवार घेऊन फोटो सेशन करणार्या मलकापूरचे उपनगराध्यक्ष आणि काँग्रेसच्या अल्पसंख्याक आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष हाजी रशीद खॉ जमदार यांच्या बचावासाठी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे धावले असून, त्यांनी जमदार यांची पाठराखण करत जिल्हा पोलीस अधीक्षकांना गुन्हे मागे घेण्यासाठी साकडेही घातले. जमदार यांच्याविरुद्ध खोटे गुन्हे दाखल …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः आपल्या वाढदिवसाच्या पार्टीत तलवारी घेऊन नाचणार्‍यांसोबत स्वतःही तलवार घेऊन फोटो सेशन करणार्‍या मलकापूरचे उपनगराध्यक्ष आणि काँग्रेसच्या अल्पसंख्याक आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष हाजी रशीद खॉ जमदार यांच्या बचावासाठी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे धावले असून, त्यांनी जमदार यांची पाठराखण करत जिल्हा पोलीस अधीक्षकांना गुन्हे मागे घेण्यासाठी साकडेही घातले.


जमदार यांच्याविरुद्ध खोटे गुन्हे दाखल आहेत. हे गुन्हे मागे घेण्यात यावे, अशी मागणी श्री. बोंद्रे यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांना भेटून केली. यावेळी त्यांच्यासमवेत मलकापूरचे आमदार राजेश एकडे, बुलडाण्याचे माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ हेही होते हे विशेष. 10 फेब्रुवारी रोजी जमदार यांच्या बर्थ डे पार्टीत नग्न तलवारी नाचविण्यात आल्या होत्या. याप्रकरणात 6 जणांना पोलिसांनी अटक करत त्यांच्याकडून 5 तलवारी जप्त केल्या आहेत. अटक केलेल्यांत जमदार यांच्यासह एका काँग्रेस नगरसेवकाचाही समावेश आहे.