हिवरा आश्रमला लवकरच 100 बेडचे कोविड केअर सेंटर!; आमदार संजय रायमूलकर यांचा पुढाकार

मेहकर (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः मेहकर तालुक्यात कोरोनाचे वाढते रुग्ण आणि तोकड्या उपाययोजना यामुळे परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. ही बाब लक्षात घेऊन आमदार संजय रायमूलकर यांनी हिवरा आश्रम येथील ग्रामीण रुग्णालयात कोरोना केअर सेंटर सुरू करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. या ठिकाणी 100 बेडची व्यवस्था केली जाईल. काल, २५ एप्रिललला आ. रायमूलकर यांनी हिवरा …
 

मेहकर (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा)  ः मेहकर तालुक्यात कोरोनाचे वाढते रुग्‍ण आणि तोकड्या उपाययोजना यामुळे परिस्‍थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. ही बाब लक्षात घेऊन आमदार संजय रायमूलकर यांनी हिवरा आश्रम येथील ग्रामीण रुग्‍णालयात कोरोना केअर सेंटर सुरू करण्यासाठी पुढाकार घेतला आहे.  या ठिकाणी 100 बेडची व्‍यवस्‍था केली जाईल.

काल, २५ एप्रिललला आ. रायमूलकर यांनी हिवरा आश्रमला भेट दिली. तेथील सोयी सुविधांची पाहणी केली. तहसीलदार डॉ. संजय गरकळ, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. महेंद्र सरपाते, विवेकानंद आश्रमाचे उपाध्यक्ष अशोक थोरहाते, मंडळ अधिकारी श्री. आकोटकर, प्राचार्य पंढरीनाथ शेळके, संजय भारती, विठ्ठल भाकडे, सरपंच पती नितीन इंगळे, डॉ. आशिष धारतरकर, आरोग्य सेवक सुनिल जेऊघाले, पवन शेळके, चेतन आकोटकर आदी उपस्थित होते.