हिवरा गडलिंग गावात कोरोना लसीकरण मोहीम

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः सरपंच पूनम अनंतकुमार खरात यांच्या पुढाकाराने हिवरा गडलिंग गावात 4 जून रोजी सकाळी 10 वाजता कोरोना लसीकरण मोहीम राबविण्यात आली. मलकापूर येथील ग्रामीण रुग्णालयाचे डॉ. ठोसरे, आरोग्यसेवक श्री. वाकोडे यांच्या पथकाने लसीकरण केले. यावेळी सरपंचपती अनंतकुमार खरात, उपसरपंच परमेश्वर चव्हाण, माजी सरपंच गजानन खरात आणि गजानन मानतकर, सदस्य कृष्णा राठोड, …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः सरपंच पूनम अनंतकुमार खरात यांच्या पुढाकाराने हिवरा गडलिंग गावात 4 जून रोजी सकाळी 10 वाजता कोरोना लसीकरण मोहीम राबविण्यात आली.

मलकापूर येथील ग्रामीण रुग्णालयाचे डॉ. ठोसरे, आरोग्यसेवक श्री. वाकोडे यांच्‍या पथकाने लसीकरण केले. यावेळी सरपंचपती अनंतकुमार खरात, उपसरपंच परमेश्वर चव्हाण, माजी सरपंच गजानन खरात आणि गजानन मानतकर, सदस्य कृष्णा राठोड, अविनाश गवई, तुळशीदास मानातकर, दासा मानातकर, रविभाऊ खरात उपस्‍थित होते. लस तुटवड्याच्या परिस्‍थितीतही सरपंचपती अनंतकुमार खरात यांनी पाठपुरावा करून गावात 45 वर्षांवरील नागरिकांसाठी लसीकरण मोहीम राबवली. हिवरागडलिंग ग्रामपंचायत बिनविरोध झाल्यामुळे हे शक्य झाल्याची प्रतिक्रिया सरपंचांनी व्‍यक्‍त केली.