ही घटना वाचून तुमच्‍या अंगावर काटे येतील… इस्‍टेटीसाठी इतका खालचा स्‍तर…?

खामगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः इस्टेटीसाठी कोण कुठता स्तर गाठेल सांगता येत नाही. दारूड्या मुलाने इस्टेटवरून वाद घालून जन्मदात्या आईला काठीने मारले. डोक्यात, हातापायांवर काठीचे वार केले. यात आई जखमी झाली. अंगावर काटे आणणारी ही घटना खामगाव शहरातील जुनेगाव घाटपुरी येथे काल, 27 जूनला सकाळी 11 च्या सुमारास घडली. गं.भा. कौशल्याबाई महादेव लोखंडकार (55, रा. …
 

खामगाव (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः इस्‍टेटीसाठी कोण कुठता स्‍तर गाठेल सांगता येत नाही. दारूड्या मुलाने इस्‍टेटवरून वाद घालून जन्‍मदात्‍या आईला काठीने मारले. डोक्‍यात, हातापायांवर काठीचे वार केले. यात आई जखमी झाली. अंगावर काटे आणणारी ही घटना खामगाव शहरातील जुनेगाव घाटपुरी येथे काल, 27 जूनला सकाळी 11 च्‍या सुमारास घडली.

गं.भा. कौशल्याबाई महादेव लोखंडकार (55, रा. जुनेगाव घाटपुरी, ता. खामगाव) असे जखमी झालेल्या आईचे नाव आहे. त्‍यांच्‍या तक्रारीवरून पोलिसांनी संदीप महादेव लोखंडकार याच्‍याविरुद्ध गुन्‍हा दाखल केला आहे. कौशल्याबाईंचे पती पाच वर्षांपूर्वी मरण पावलेले आहेत. त्‍यांना चार मुले व एक मुलगी आहे. मुलीचे लग्‍न झालेले आहे. त्‍या तीन नंबरचा मुलगा पांडुरंगसोबत राहतात.

कौशल्याबाईंच्‍या तक्रारीनुसार, त्‍यांचा दोन नंबरचा मुलगा संदीपला दारूची सवय आहे. तो नेहमी कौशल्याबाईंशी इस्‍टेटीवरून वाद घालत असतो. काल सकाळी संदीप दारू पिऊन आला व त्‍यांना म्हणाला, की तू इस्टेटीमध्ये माझा वाटा देते की नाही… त्‍यावरून त्‍याने शिविगाळ केली. दारात पडलेली काठी उचलून आईच्‍या डोक्यावर तसेच डाव्‍या हाताच्‍या पोटरीवर मारले. त्यामुळे आईच्‍या डोक्याला बेंड आले. डाव्या हाताच्‍या पोटरीवर जखम होऊन रक्त वाहू लागले. पांडुरंग लोखंडकार याने त्यास आवरले. अन्यथा त्‍याने आईला आणखी मारहाण केली असती, असे तक्रारीत म्‍हटले आहे. तपास शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे नापोकाँ. श्री. मोटे करत आहेत.