ही मॉडेल, अभिनेत्री लढविणार यूपीतून जिल्हा परिषदेची निवडणूक

भाजपची उमेदवार दीक्षा सिंह ठरली आकर्षणाचे केंद्र लखनौ : बॉलिवूडमधील अभिनेते, कलाकार राजकारणात उतरण्याचा ट्रेंड वरचेवर वाढत चालला आहे. इतके दिवस हे नेते बॉलिवूड कलाकार नेत्यांच्या प्रचारसभांत हे कलाकार रोड शो करून गर्दी जमवतात. पण आता हळूहळू अनेक कलाकार राजकारणात उतरत आहेत. आमदार, खासदार, मंत्री होत आहेत. आता आणखी एक मॉडेल, बॉलिवूड अभिनेत्री राजकारणात येऊ …
 

भाजपची उमेदवार दीक्षा सिंह ठरली आकर्षणाचे केंद्र

लखनौ : बॉलिवूडमधील अभिनेते, कलाकार राजकारणात उतरण्याचा ट्रेंड वरचेवर वाढत चालला आहे. इतके दिवस हे नेते बॉलिवूड कलाकार नेत्यांच्या प्रचारसभांत हे कलाकार रोड शो करून गर्दी जमवतात. पण आता हळूहळू अनेक कलाकार राजकारणात उतरत आहेत. आमदार, खासदार, मंत्री होत आहेत. आता आणखी एक मॉडेल, बॉलिवूड अभिनेत्री राजकारणात येऊ पाहत आहे. २०१५-फेमिना मिस इंडिया स्पर्धेतील रनरअप दीक्षा सिंह ही उत्तर प्रदेशात जौनपूर जिल्हा पंचायतीची निवडणूक लढणार आहे. तिला भाजपने उमेदवारी देऊ केली आहे. दीक्षा सिंह ही बक्शा जि.प. मतदारसंघातील चितौडी गावाची रहिवासी असून तिने जिल्हा पंचायत सदस्यत्वासाठी उमेदवारी अर्ज भरला आहे. घरोघरी जाऊन मी मते मागणार आहे, असे तिने जाहीर केले आहे.
दीक्षा सिंह बॉलिवूडमध्ये यशस्वी होण्यासाठी ती संघर्ष करत आहे. फेब्रुवारी २०२१ मध्ये तिचा ’रब्बा मेहर करे’ या नावाचा अल्बम आला होता.शिवाय तिने ’इश्क तेरा’ या चित्रपटाची स्टोरी तिने लिहिली होती. पॅन्टीन, पॅराशूट ऑईल, स्नॅप डील आदी जाहिरातींमध्ये मॉडेल म्हणून काम केलेल्या दीक्ष सिंह वेब सीरीजमध्येही काम करत आहे. राजकारणात येऊन आपल्याला सामाजिक बदल घडवायचा आहे. राजकारणात आपला पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आपला आदर्श आहेत, असे दीक्षा सांगते.