हुंड्यासाठी छळ असह्य; विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या, संग्रामपूर तालुक्यातील घटना

संग्रामपूर (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः संग्रामपूर तालुक्यातील काटेल येथे 26 वर्षीय विवाहितेने हुंड्यासाठी सतत होणार्या शारीरिक व मानसिक छळाला कंटाळून राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना 26 जानेवारी रोजी घडली.तालुक्यातील भोन येथील रहिवासी कैलास फाळके यांना तीन विवाहित मुली असून, 1 मुलगा आहे. त्यात मोठी मुलगी प्रियंका हिचा विवाह काटेल येथील शत्रुघ्न वामनराव डामरे …
 

संग्रामपूर (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः संग्रामपूर तालुक्यातील काटेल येथे 26 वर्षीय विवाहितेने हुंड्यासाठी सतत होणार्‍या शारीरिक व मानसिक छळाला कंटाळून राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना 26 जानेवारी रोजी घडली.
तालुक्यातील भोन येथील रहिवासी कैलास फाळके यांना तीन विवाहित मुली असून, 1 मुलगा आहे. त्यात मोठी मुलगी प्रियंका हिचा विवाह काटेल येथील शत्रुघ्न वामनराव डामरे याच्याशी 3 जून 2014 रोजी झाला होता. सुरुवातीचे काही दिवस सुखी संसार चालला. प्रियंकाला 1 मुलगी 1 मुलगा झाला. मात्र नंतर हुंड्यासाठी शारीरिक मानसिक छळ सुरू झाल्याने व त्रास असहाय्य झाल्याने प्रियंकास वडिलांनी भोन येथे आणले. 2 वेळा पोलिसांत तक्रार झाली. मात्र नागरिकांच्या मध्यस्थीने व समेट झाल्याने पुन्हा प्रियंका नांदावयास काटेल येथे गेली. मात्र पुन्हा प्रियंकाला सासू, सासरे, पती, देर यांनी संगमत करून हुंड्याच्या वाढीव रकमेसाठी छळणे सुरू केले. त्रास असाहाय्य झाल्याने प्रियंकाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची लेखी तक्रार तामगाव पोलीस स्टेशनला कैलास फाळके यांनी दिली. तामगाव पोलिसांनी पती शत्रुघ्न वामन डामरे, सासरा वामन हरीराम डामरे, दीर शिवाजी वामन डामरे, केसर वामन डामरे सर्व (रा. काटेल) यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला. आरोपींना अटक करून न्यायालयात हजर केले असता न्यायाधीशांनी 3 दिवस पोलीस कोठडी सुनावली. तामगावचे ठाणेदार भूषण गावंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरिक्षक श्रीकांत विखे पाटील तपास करत आहेत.