हुssश! आज 662 पॉझिटिव्ह!! 5 हजारांवर अहवाल; पण पेशंट कमी

बुलडाणा (विशेष प्रतिनिधी ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः मागील आठवड्यापासून जीव टांगणीला लागलेल्या आरोग्य यंत्रणा व प्रशासनाने किमान आजच्यापुरता तरी सुटकेचा श्वास सोडावा, दिलासा मानावा असाच आजचा कोरोना अहवाल आहे. 5 हजारांवर अहवाल हाती आले असतानाही केवळ 662 पॉझिटिव्ह आले आहेत. कालच्या 1327 च्या तुलनेत हा आकडा 24 तासांपुरता का होईना दिलासा ठरणारा आहे. गत् …
 

बुलडाणा (विशेष प्रतिनिधी ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः मागील आठवड्यापासून जीव टांगणीला लागलेल्या आरोग्य यंत्रणा व प्रशासनाने किमान आजच्यापुरता तरी सुटकेचा श्वास सोडावा, दिलासा मानावा असाच आजचा कोरोना अहवाल आहे. 5 हजारांवर अहवाल  हाती आले असतानाही केवळ 662 पॉझिटिव्ह आले आहेत. कालच्या 1327 च्या तुलनेत हा आकडा 24 तासांपुरता का होईना दिलासा ठरणारा आहे.

गत्‌ 24 तासांत 5821 स्वॅब नमुने संकलित करण्यात आले. या तुलनेत 5 हजार136 जणांचे अहवाल प्राप्त झाले. यातील तब्बल 4344 अहवाल निगेटिव्ह आले आहेत. यातील 662 अहवाल पॉझिटिव्ह असून, या  पॉझिटिव्हीचा दर 13 टक्‍क्‍यांपेक्षा कमी (12.88) आहे. या दिलाशामध्येही बुलडाणा (103) , नांदुरा ( 102) हे तालुके शतकवीर ठरले! शतकापासून वंचित राहिलेल्या चिखली 81, मलकापूर 62, खामगाव 52, मोताळा 53, जळगाव जामोद 50, सिंदखेड राजा 49 या तालुक्यातील रुग्णसंख्येत घट दिसून आली. कोरोनाचा प्रकोप असलेल्या देऊळगाव राजा 28, शेगाव 26, मेहकर 10, लोणार 30 या तालुक्यातील तीव्रता कमी झाली आहे. संग्रामपूरमध्ये 22 पॉझिटिव्ह निघणे बातमीच आहे.

…पण 9 बळी!

दरम्यान, बाधितचा आकडा कमी असला तरी गत 24 तासांत 9 रुग्णांचा मृत्यू होणे हा दिलाशावर सॅनिटाईझर फिरवल्यासारखी बाब ठरावी! बुलडाणा येथील महिला रुग्णालयातील 4, टीबी रुग्णालयातील 1, लद्धड हॉस्पिटलमधील 2, हेडगेवार हॉस्पिटल चिखलीमधील 1 ,शेगाव सामान्य रुग्णालयातील एका रुग्णाचा समावेश आहे.