हे तुमच्यासोबतही घडू शकते…! पोलीस असल्याचे सांगून मोटारसायकल अडवली अन्‌ वृद्धाचे दीड लाखाचे दागिने घेऊन दोन भामटे झाले पसार!; खामगाव शहरातील धक्‍कादायक घटना

खामगाव (भागवत राऊत ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः मोटारसायकलला इशारा करून वृद्धाला थांबवले. नंतर पोलीस असल्याचे सांगून वृद्धाचे दीड लाख रुपयांचे दागिने घेऊन दोन भामटे पसार झाल्याची खळबळजनक घटना खामगाव शहरातील पुण्याई हॉटेलसमोर काल, ८ ऑक्टोबरला सकाळी दहाच्या सुमारास घडली. खामगाव शहर पोलीस आता या भामट्यांचा शोध घेत आहेत. भिकाजी तुकाराम रोहणकार (७२,रा. वामननगर, खामगाव) …
 
हे तुमच्यासोबतही घडू शकते…! पोलीस असल्याचे सांगून मोटारसायकल अडवली अन्‌ वृद्धाचे दीड लाखाचे दागिने घेऊन दोन भामटे झाले पसार!; खामगाव शहरातील धक्‍कादायक घटना

खामगाव (भागवत राऊत ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः मोटारसायकलला इशारा करून वृद्धाला थांबवले. नंतर पोलीस असल्याचे सांगून वृद्धाचे दीड लाख रुपयांचे दागिने घेऊन दोन भामटे पसार झाल्याची खळबळजनक घटना खामगाव शहरातील पुण्याई हॉटेलसमोर काल, ८ ऑक्‍टोबरला सकाळी दहाच्‍या सुमारास घडली. खामगाव शहर पोलीस आता या भामट्यांचा शोध घेत आहेत.

भिकाजी तुकाराम रोहणकार (७२,रा. वामननगर, खामगाव) यांनी या प्रकरणात तक्रार दिली. ते खामगाववरून शेगाव तालुक्‍यातील शेतात जात होते. पुण्याई हॉटेलसमोरून मोटारसायकलने जात असताना त्‍यांना अचानक युनिकॉर्न मोटारसायकलवरील दोघांनी ओव्‍हरटेक करत पुढे जाऊन थांबवले. त्‍यातील एकाने आम्‍ही पोलीस असून, दोन लाख रुपये डिक्‍कीतून चोरीला गेले आहेत. तो तपास माझ्याकडे आहे, असे सांगितले. तुमचेही दागिने, पैसे काढून रूमालात बांधून डिक्‍कीत ठेवा, असे सांगत लगेच दोघांनी त्‍यांचे दागिनेही काढून घेत रूमालात गुंडाळून डिक्‍कीत ठेवल्याचे नाटक केले व पसार झाले.

रोहणकार यांना शंका आल्याने त्‍यांनी लगेचच रूमालाची गाठ सोडून दागिने तपासण्याचा प्रयत्‍न केला. पण गाठ इतकी घट्ट त्‍यांनी बांधली होती, की सुटेपर्यंत दोन्‍ही भामटे खूप दूर निघून गेले. रूमालातील सोन्याची अंगठी आणि सोन्याचा गोफ त्‍यांनी लंपास केली होती. रोहणकार यांनी तातडीने खामगाव शहर पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. गळ्यातील सोन्याचा गोफ वजन ४० ग्रॅम (किंमत १ लाख रुपये), हातातील सोन्याची अंगठी वजन अंदाजे २० ग्रॅम (किंमत ५० हजार) असा एकूण दीड लाख रुपयांचा मुद्देमाल भामट्यांनी चोरून नेल्याचे तक्रारीत म्‍हटले आहे.