हॉटेलमध्ये घरगुती गॅस सिलिंडर अन्‌ दुकानातून पेट्रोल विक्री!; जिल्हाभरात 6 हॉटेलवर कारवाई; अवैध पेट्रोल विकणाऱ्या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः हॉटेलमध्ये घरगुती स्वयंपाकाचा गॅस वापरणाऱ्यांवर पोलिसांनी जिल्हाभरात कारवाईचे सत्र सुरू केले आहे. यासोबतच पेट्रोल पंपाव्यतिरिक्त अन्य ठिकाणी अवैधरित्या पेट्रोल विकणाऱ्यांवरही कारवाई केली जात आहे. गेल्या दोन दिवसांत जिल्हाभरात विविध पोलीस ठाण्यांनी अवैध गॅस सिलिंडर बाळगल्या प्रकरणी 8 तर अवैध पेट्रोल विक्रीप्रकरणी 3 जणांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत. अमडापूर पोलिसांनी निवृत्ती …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः हॉटेलमध्ये घरगुती स्वयंपाकाचा गॅस वापरणाऱ्यांवर पोलिसांनी जिल्हाभरात कारवाईचे सत्र सुरू केले आहे. यासोबतच पेट्रोल पंपाव्यतिरिक्त अन्य ठिकाणी अवैधरित्या पेट्रोल विकणाऱ्यांवरही कारवाई केली जात आहे. गेल्या दोन दिवसांत जिल्हाभरात विविध पोलीस ठाण्यांनी अवैध गॅस सिलिंडर बाळगल्या प्रकरणी 8 तर अवैध पेट्रोल विक्रीप्रकरणी 3 जणांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत.

  • अमडापूर पोलिसांनी निवृत्ती साहेबराव अंभोरे (52, रा. मंगरूळ नवघरे) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. तो पानटपरीवर अवैधरित्या पेट्रोल विकत होता. ही कारवाई 28 जूनला सायंकाळी करण्यात आली. दुसऱ्या कारवाईत हिंमत ज्ञानेश्वर गिरगुणे (42) याच्‍या माउली उपहारगृहावर छापा मारण्यात आला. त्यावेळी तोही अवैधरित्या पेट्रोल विकताना आढळला.
  • बुलडाणा शहर पोलिसांनी आज 30 जून रोजी धाड नाक्यावरील हॉटेल सूर्योदयवर कारवाई केली. विष्णू शेषराव निळकंठ (22) या हॉटेलमालकावर घरगुती वापराचे सिलिंडर वापरल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.
  • बुलडाणा ग्रामीण पोलिसांनी केलेल्या कारवाईत शेख अक्रम शेख मेहमूद (33, रा. देऊळघाट) हा त्याच्‍या हॉटेलवर घरगुती गॅस सिलिंडर वापरत होता. त्याच्‍याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. सुभाष कौतिकराव उबाळे (32, रा. गिरडा ता. बुलडाणा) हा त्याच्‍या गिरडा रोडवरील हॉटेल समाधानमध्ये घरगुती गॅस सिलिंडर वापरत होता. त्याच्‍याविरुद्धही बुलडाणा ग्रामीण पोलिसांनी गुन्‍हा दाखल केला आहे.
  • दिलीप माधव सोनुने (52, रा. गिरडा) हा त्याच्या हॉटेल विजयमध्ये घरगुती गॅस सिलिंडर वापरत होता. त्याच्‍याविरुद्ध बुलडाणा ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
  • चिखली पोलिसांनी केलेल्या कारवाईत दत्तात्रय जगदीश सिताफळे (47, रा. गजानननगर चिखली) याच्या घरात आवश्यकतेपेक्षा जास्त घरगुती वापराचे 4 गॅस सिलिंडर आढळले. त्याच्‍याविरुद्ध चिखली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. रियाज खान रहीम उद्दीन (45, रा. माळीपुरा, चिखली) याच्या घरात घरगुती वापराचे 16 सिलिंडर सापडले. मुद्देमाल जप्त करून चिखली पोलीस ठाण्यात त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. चिखली शहराजवळील जांबवाडी येथील हॉटेल जय अंबे हॉटेलवर केलेल्या कारवाईत घरगुती वापराचे 1 गॅस सिलिंडर आढळले. हॉटेलमालक विलास मारोती पवार (61, रा. गोविंदपुरा, चिखली) याच्‍याविरुद्ध चिखली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. अनिल विजय जाधव (35, रा. भरोसा ता. चिखली) याची जांबवाडी येथेच शिवशाही नावाची हॉटेल आहे. हॉटेलवर छापा मारून घरगुती गॅस सिलिंडर जप्त करून गुन्हा दाखल करण्यात आला.
  • धाड पोलीसांनी केलेल्या कारवाईत राहुल सुभाष कदम(24) याच्‍याविरुद्ध अवैध पेट्रोल विक्रीप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. तो त्याच्या टायर पंक्चरच्‍या दुकानावर पेट्रोल विकत होता.