होळीला दिलासा! 735 पॉझिटिव्ह रुग्‍ण! खामगावसह 7 तालुक्यांतील उद्रेक कायम!!

बुलडाणा (विशेष प्रतिनिधी ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा)ः 27 मार्चला जिल्ह्याला हादरविणाऱ्या व आरोग्य यंत्रणांना मोठा धक्का देणाऱ्या कोरोनाने आज, 28 मार्चला सुमारे 28 लाख जिल्हावासीयांना होळीच्या मुहूर्तावर जास्त न सतावता व दिलासा दिलाय! काल शनिवारच्या 1130 पॉझिटिव्हच्या तुलनेत आज 28 मार्चला कमी म्हणजे 735 कोरोना बाधित आढळले. 27 मार्चच्या मुहूर्तावर रेकॉर्डब्रेक 1130 पॉझिटिव्ह आढळले होते. …
 

बुलडाणा (विशेष प्रतिनिधी ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा)ः 27 मार्चला जिल्ह्याला हादरविणाऱ्या व आरोग्य यंत्रणांना मोठा धक्का देणाऱ्या कोरोनाने आज, 28 मार्चला सुमारे 28 लाख जिल्हावासीयांना होळीच्या मुहूर्तावर जास्त न सतावता व दिलासा दिलाय! काल शनिवारच्या 1130 पॉझिटिव्हच्या तुलनेत आज 28 मार्चला कमी म्‍हणजे 735 कोरोना बाधित आढळले.

27 मार्चच्या मुहूर्तावर रेकॉर्डब्रेक 1130 पॉझिटिव्ह आढळले होते. बुलडाणा अडीचशे, चिखली दोनशेच्या घरात पोहोचले तर 3 तालुक्यांनी शतकीय आकडा ओलांडला होता. या तुलनेत आज खामगाव तालुक्याने सव्वाशेचा आकडा गाठला. चिखली 99, बुलडाणा 94 व मलकापूर 90 हे तालुके सेंच्युरीपूर्वीच रन आऊट झाले! 30 तारखेचा आपला वाढदिवस साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय जाहीर करणाऱ्या पालकमंत्र्यांच्या मतदारसंघातील सिंदखेडराजा 86 आणि देऊळगावराजा 46 या तालुक्यातील कोरोनाचा उद्रेक कायम असल्याचे चित्र आहे. या तुलनेत 5 तालुक्यांतील आकडेवारी सौम्य आहे. मोताळा 39, जळगाव जामोद 26, नांदुरा 28, मेहकर 25, लोणार 20 अशी पॉझिटिव्हची संख्या आहे. मात्र उद्या हा दिलासा कायम राहील याची हमी कोण घेणार ? आज जिल्ह्यात पेटणाऱ्या  लाखो होळ्यांमध्ये कोरोना भसमसात होऊ या शुभेच्छा भाबडा आशावाद आहे. मानवतेचा हा शत्रू इतका सहजासहजी हटणारा, हारणारा, हलणारा नाहीये, हेही तितकेच खरे.