ह्याच सरपंच पाह्यजे…!; ग्रामस्‍थांनी दिला “निकाल’; सदस्य तोंडघशी!!, जऊळकातील प्रकार

सिंदखेड राजा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जऊळका (ता. सिंदखेड राजा) येथील महिला सरपंच द्वारकाबाई प्रभाकर सांगळे यांच्या पाठिशी ग्रामस्थ खंबीरपणे उभे राहिले आणि अविश्वास ठराव पारित करणाऱ्या सदस्यांना तोंडघशी पाडल्याचा प्रकार घडला आहे. काल, २ सप्टेंबरला यासाठी ग्रामसभा घेण्यात आली होती. सरपंचांच्या बाजूने २३७ तर विरोधात १६७ मते पडली. ७० मतांमुळे सरपंच कायम राहिल्या. तशी …
 
ह्याच सरपंच पाह्यजे…!; ग्रामस्‍थांनी दिला “निकाल’; सदस्य तोंडघशी!!, जऊळकातील प्रकार

सिंदखेड राजा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जऊळका (ता. सिंदखेड राजा) येथील महिला सरपंच द्वारकाबाई प्रभाकर सांगळे यांच्‍या पाठिशी ग्रामस्‍थ खंबीरपणे उभे राहिले आणि अविश्वास ठराव पारित करणाऱ्या सदस्यांना तोंडघशी पाडल्‍याचा प्रकार घडला आहे.

काल, २ सप्‍टेंबरला यासाठी ग्रामसभा घेण्यात आली होती. सरपंचांच्‍या बाजूने २३७ तर विरोधात १६७ मते पडली. ७० मतांमुळे सरपंच कायम राहिल्या. तशी घोषणा निवडणूक निर्णय अधिकारी नायब तहसीलदार प्रवीण लटके यांनी दिली. सरपंच सांगळे या थेट जनतेतून निवडून आलेल्या आहेत. मात्र गावातील राजकारणामुळे विकासावर परिणाम झाला आहे. उपसरपंचासह सदस्यांनी अविश्वास ठराव आणूनही ग्रामस्‍थांनी सरपंचांच्‍या बाजूने कौल दिल्यामुळे आता तरी राजकारण बंद करून सर्व सदस्य, पदाधिकाऱ्यांनी विकासाकडे लक्ष दिले पाहिजेत, अशी भावना ग्रामस्‍थांनी व्‍यक्‍त केली आहे. यावेळी ठाणेदार युवराज रबडे यांनी चांगला बंदोबस्‍त ठेवला होता.