११ वीत असतानाच प्राजक्‍ता माळीला झालं होतं प्रेम!

मुंबई ः प्राजक्ता माळी ही केवळ अभिनेत्री नाही. ती चांगली कवयित्री आहे. सूत्रसंचालनात तिचा हातखंडा आहे. एक उत्कृष्ट नृत्यांगणा म्हणून महाराष्ट्र तिच्यावर फिदा आहे. हजारो दिलाची धडकन असलेली प्राजक्ता आता कुणाच्या तरी प्रेमात पडली आहे.तिचा प्राजक्तप्रभा हा काव्य संग्रह नुकताच प्रकाशित झाला. त्यातून संवेदनशील आणि तरल मनाची कवयित्री म्हणून तिची नव्यानं ओळख झाली. प्राजक्ता वेगवेगळ्या …
 

मुंबई ः प्राजक्ता माळी ही केवळ अभिनेत्री नाही. ती चांगली कवयित्री आहे. सूत्रसंचालनात तिचा हातखंडा आहे. एक उत्कृष्ट नृत्यांगणा म्हणून महाराष्ट्र तिच्यावर फिदा आहे. हजारो दिलाची धडकन असलेली प्राजक्ता आता कुणाच्या तरी प्रेमात पडली आहे.तिचा प्राजक्तप्रभा हा काव्य संग्रह नुकताच प्रकाशित झाला. त्यातून संवेदनशील आणि तरल मनाची कवयित्री म्हणून तिची नव्यानं ओळख झाली.

प्राजक्ता वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत असते. ती आता एका स्पेशल कवितेमुळे चर्चेत आली आहे. बाॅयफ्रेंडसाठी तिनं ही कविता लिहिली आहे. त्यामुळे हा सोशल मीडियात चर्चेचा विषय झाला आहे. मराठी चित्रपट आणि मालिकांतून सातत्यानं भेटणारी प्राजक्ता सोशल मीडियावरही तितकीच सक्रिय आहे. कधी ग्लॅमरस फोटो, तर कधी तिच्या हटक्या पोस्ट तिची दखल घ्यायला लावतात. युरोप दाैऱ्याच्या वेळी तिनं तिच्या बॉयफ्रेंडसोबतचे फोटो शेअर केले होते. तिचा हा बाॅयफ्रेंड कोण, ती त्याच्या प्रेमात पडली आहे का असे एक ना अनेक प्रश्न तिच्या चाहत्यांना पडले होते. आता इतक्या वर्षांनंतर प्राजक्तानं तिच्या प्रेमाची कबुली दिली आहे.

तिनं तिच्या कवितेच्या माध्यमातूनच बॉयफ्रेंडला प्रपोज केलं होतं. प्राजक्ता अकरावीत असताना तिचं एका मुलावर प्रेम जडलं होतं. त्या वेळी प्रेम व्यक्त करण्यासाठी तिनं प्रेमाचां रंग म्हणून ओळख असलेल्या लाल रंगाच्या पेनानं कविता लिहिली होती. प्यार, इश्क, मोहब्बत, ये लब्ज भी सरल शब्द जैसे, सरल नहीं तो इसके रास्ते और मंजिले क्या खाक सरल होंगे, असं तिनं म्हटलं होतं. प्रेमाची कबुली दिली असली, तरी तो मुलगा कोण, त्याचं पुढं काय झालं, हे गूढ तिनं कायम ठेवलं आहे. सध्या ती सिंगल आहे. लग्नाची तयारी सुरू आहे; पण नवरदेव भेटलेला नाही, असं तिनं म्हटलं होतं. लग्नासाठी तिच्या आईनं सोन्याची आणि अन्य खरेदी केव्हाच सुरू केली आहे. नवऱ्या मुलाचा शोध संपला, की ती लग्नाच्या बेडीत अडकणार आहे.