१३०० व्यापाऱ्यांत तुमचा सहभाग आहे का?

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः कव्हरेज गुरु संस्था आणि बुलडाणा लाइव्हचा संयुक्त उपक्रम असलेल्या “बुलडाणा मार्केट डिक्शनरी’त (केवळ बुलडाणा शहरासाठी) आपला व्यवसाय समाविष्ट असावा यासाठी आजवर अनेक व्यापाऱ्यांनी पुढाकार घेतला आहे. तब्बल १३०० व्यावसायिक, व्यापाऱ्यांनी या डिक्शनरीत नोंद केली आहे. वर्षभर घरात राहणारी ही डिक्शनरी खरेदीसाठी एक प्रकारची मार्गदर्शक ठरणार असून, कोणती वस्तू कुठे मिळते, …
 
१३०० व्यापाऱ्यांत तुमचा सहभाग आहे का?

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः कव्‍हरेज गुरु संस्‍था आणि बुलडाणा लाइव्हचा संयुक्‍त उपक्रम असलेल्या “बुलडाणा मार्केट डिक्‍शनरी’त (केवळ बुलडाणा शहरासाठी) आपला व्यवसाय समाविष्ट असावा यासाठी आजवर अनेक व्यापाऱ्यांनी पुढाकार घेतला आहे. तब्‍बल १३०० व्यावसायिक, व्यापाऱ्यांनी या डिक्‍शनरीत नोंद केली आहे. वर्षभर घरात राहणारी ही डिक्‍शनरी खरेदीसाठी एक प्रकारची मार्गदर्शक ठरणार असून, कोणती वस्‍तू कुठे मिळते, कोणती सेवा कोण देतं, याबद्दलची माहिती या डिक्‍शनरीच्‍या माध्यमातून बुलडाणेकरांना मिळणार आहे. १० हजार निवडक वाचकांना बुलडाणा लाइव्हतर्फे ही डिक्‍शनरी मोफत दिली जाणार असून, अन्य वाचकांना ती अत्‍यल्प शुल्कात उपलब्‍ध असेल. त्‍यामुळे कोणत्‍याही व्‍यावसायिक किंवा सेवादात्‍याला या डिक्‍शनरीत आपली सेवा, व्यवसाय समाविष्ट करणे अत्‍यंत लाभाचे ठरणार आहे. ग्राहक जोडून ठेवण्यासाठी आणि वाढविण्याचे कामच ही डिक्‍शनरी करणार आहे असे म्‍हटले तरी अतिशोक्‍ती ठरणार नाही, अशी प्रतिक्रिया अनेक व्यापाऱ्यांनी बुलडाणा लाइव्हच्‍या प्रतिनिधीशी बोलताना दिली. वस्त्रदालने, किराणा दुकाने, सुपर शॉपी, मॉल्स, फुटवेअर, ज्वेलर्स, मोबाइल शॉपी, कॉम्प्युटर्स सेल्स ॲन्ड सर्व्हिस, फुल भांडार, बांधकाम व्यावसायिक, डॉक्टर्स, फिटनेस सेंटर्स, सलून्स, ब्युटी पार्लर्स, फर्निचर्स, इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्टिकल्स, मशिनरी स्टोअर्स,ट्रॅव्हल्स,ऑप्टिकल्स,क्लासेस, वकील, मेडिकल्स, मल्टि सर्व्हिसेस, सीए, बॅग हाऊसेस,सेक्युरिटी सर्व्हिसेस, आर्टिकेक्ट,हॉटेल्स, रेस्टॉरंट्‌स, मंगल कार्यालये,बँका, पतसंस्था,गॅरेज, गृहउद्योग, बुटिक,गिफ्ट शॉपी,आयुर्वेदिक औषधे,थेरपिस्ट, डेअरी,स्पोर्ट्‌स शॉपी अशा सर्वच स्वरुपाचे व्यावसायिक आपली नोंदणी या डिक्‍शनरीत करू शकतात. चला तर मग लगेच बुलडाणा लाइव्हला संपर्क करा आणि बुलडाणा लाइव्हचा प्रतिनिधी थेट तुमच्‍यापर्यंत बोलावून घ्या. संपर्कासाठी मोबाईल क्रमांक ः 9922359674